• पावसाळ्यापूर्वी बीएमसीची तयारी जोमात; नालेसफाईच्या कामाला गती

    पावसाळ्यापूर्वी बीएमसीची तयारी जोमात; नालेसफाईच्या कामाला गती

    येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) जोरात तयारी करत असून, मुख्याधिकारी भूषण गगराणी यांनी गुरुवारी शहरातील महत्त्वाच्या नाल्यांची पाहणी करत गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, नाल्यांमधून बाहेर काढलेला गाळ ४८ तासांच्या आत निश्चित जागी योग्यरीत्या विल्हेवाट लावण्यात यावा. तसेच, निचरा सुरळीत राहण्यासाठी नाल्यांमध्ये कचऱ्यामुळे…

  • राहुल गांधींना सावरकरांवर विधान करणं भोवलं; सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं

    राहुल गांधींना सावरकरांवर विधान करणं भोवलं; सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल टिपण्णी केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना चांगलेच फटकारले आहे. न्यायालयाने राहुल गांधी यांना स्वातंत्र्यसैनिकांची खिल्ली उडवू नये असे म्हटले आहे. तुम्ही राजकारणी आहात, अशी बेजबाबदार विधाने करू नका.जर असे विधान पुन्हा केले गेले तर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल असेही सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना खडसावले.…

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील पहिले असे विमानतळ ठरणार आहे, जिथे वॉटर टॅक्सीच्या स्वरूपात जलवाहतूक सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सिडकोच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, “विमानतळासाठी रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जलवाहतूक या सर्व प्रकारच्या वाहतूक व्यवस्थांचा समावेश असलेली बहुविध जोडणी…

  • पाऊस भरपूर तरीही हंडाभर पाण्यासाठी वणवण; पालघर जिल्ह्यातील अनेक गावात पाणीटंचाई

    पाऊस भरपूर तरीही हंडाभर पाण्यासाठी वणवण; पालघर जिल्ह्यातील अनेक गावात पाणीटंचाई

    पालघर जिल्ह्यात दरवर्षी मोठ्याप्रमाणात पाऊस होत असला तरी जिल्ह्यातील अनेक भागात पाणी टंचाईचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. पाऊस भरपूर पडला तरी नियोजनाच्या अभावामुळे पाणीटंचाईची समस्या सुटलेली नाही. पालघर जिल्ह्यातील मोखाडा, वाडा, जव्हार, विक्रमगड या तालुक्यातील शेकडो गाव पाड्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतोय. पालघर जिल्ह्यातील हे तालुके आणि पाणीटंचाई…

  • शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1000 ने खाली; 10 लाख कोटी रुपये बुडाले

    शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1000 ने खाली; 10 लाख कोटी रुपये बुडाले

    भारतीय शेअर बाजारमधून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण झाली आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदाराना 10 लाख कोटी रुपयांचं नुकसान सहन करावा लागला आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स जवळजवळ 1,000 अंकांनी घसरून 78,800 च्या पातळीवर पोहोचला. दुसरीकडे, निफ्टी सुमारे 335 अंकांनी घसरून 23,908 च्या पातळीवर पोहोचला. सर्वात…

  • रिक्षाचालकाची मुलगी आदिबा महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आयएएस

    रिक्षाचालकाची मुलगी आदिबा महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आयएएस

    यवतमाळची आदिबा अनम अश्फाक अहमद ही महाराष्ट्राची पहिली मुस्लिम महिला आयएएस (भारतीय प्रशासकीय सेवा) बनणार आहे. नुकतंच UPSC चा निकाल जाहीर झाला. देशभरातून 1009 उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यापैकी आदीबा हिचा ऑल इंडिया रँक हा 142 वा आला आहे. या निवडीनंतर तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. तिचे वडील रिक्षाचालक असून…

  • कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकेपासून दिलासा

    कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकेपासून दिलासा

    स्टँड-अप कॉमेडी कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी देशद्रोही अशी टीका केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले आहे. मुख्य न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने कामरा यांच्याविरोधातील प्रकरणातील निकाल राखून ठेवत, अंतिम निर्णय होईपर्यंत त्यांना…

  • महिलेची ५ कोटी रुपयांची सायबर फसवणूक; पोलिसांनी रॅकेटचा पर्दाफाश केला

    महिलेची ५ कोटी रुपयांची सायबर फसवणूक; पोलिसांनी रॅकेटचा पर्दाफाश केला

    मालाडमधील मालवणी पोलिसांनी एका मोठ्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. २० वर्षीय तमन्ना गौस या महिलेला आयकर विभागाकडून ५ कोटी रुपयांच्या अनोळखी रोख ठेवींबाबत नोटीस प्राप्त झाली आणि त्यानंतर ती घाबरली होती. यामुळे पोलिसांनी सायबर फसवणूक आणि ओळख चोरीसारख्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला आणि ५ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा मोठा रॅकेट…

  • लग्नाचं आमिष दाखवून तरुणींवर अत्याचाराच्या घटनेत वाढ; पोलिसात गुन्हे दाखल

    लग्नाचं आमिष दाखवून तरुणींवर अत्याचाराच्या घटनेत वाढ; पोलिसात गुन्हे दाखल

    लग्नाचं आमिष दाखवून तरुणींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. अशाच प्रकारच्या दोन घटना नारपोली पोलीस ठाण्याच्या परिसरात घडल्या आहेत. बलात्कारप्रकरणी भिवंडी शहरातील नारपोली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कामत यांनी दिली आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत…

  • अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

    अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

    कोल्हापुरातील शिक्षकाला विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.याला जिल्हा व सत्र न्यायाधीश (१) पी. एफ. सय्यद यांनी तीन वर्षे सक्तमजुरी तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी बुधवारी २३ एप्रिल रोजी या खटल्याचा निकाल लागला आहे.ही घटना 9 फेब्रुवारी 2019 रोजी घडली होती.…