-

शाळांच्या कामकाजात एकसूत्रीपणा आणण्यासाठी मोठा निर्णय; राज्यातील शाळांची माहिती मिळणार एका क्लिकवर
•
राज्यातील शाळांबाबत सरकारने मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शाळांची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. शाळांच्या कामकाजात एकसूत्रीपणा आणण्यासाठी मोबाईल अॅपच्या माध्यमातून जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील ग्रामीण, शहरी भागातील प्राथमिक शिक्षणाचे संस्कार केंद्र असणाऱ्या अंगणवाडी, विविध माध्यमांच्या त्यानुसार राज्यातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रांना…
-

जागतिक हिवताप दिनानिमित्त ठाण्यात जनजागृती अभियान; या आजारापासून अशी घ्या काळजी
•
ठाणे : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन ठाणे जिल्ह्यात विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येत आहे. या दिनानिमित्त हिवताप या कीटकजन्य आजाराबाबत जनजागृती करणे, प्रतिबंधात्मक उपायांची माहिती पोहोचवणे आणि जनतेचा सक्रिय सहभाग मिळवणे हे उद्दिष्ट असल्याचं संबंधित विभागाकडून कळतंय. या उपक्रमास जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन…
-

चराई अनुदानाचे 3054 मेंढपाळांच्या बँक खात्यात 7.33 कोटी जमा
•
राज्यातील ३ हजार मेंढपाळांच्या बँक खात्यात ७ कोटी जमा झाल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने राज्यातील भटक्या जमाती (भज-क) प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील 3054 मेंढपाळांना सन 2024-25 या वर्षासाठी चराई अनुदानापोटी 7.33 कोटी अनुदानाचे थेट हस्तांतरण (डीबीटी)द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात…
-

मुंबईतील जुन्या उपकरप्राप्त इमारतींच्या भाडेकरूंना महत्त्वाची सवलत, अतिरिक्त क्षेत्रासाठी १००% रेडी रेकनर दर लागू
•
मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्बांधणी मंडळाच्या (MBRRB) मास्टर लिस्टमध्ये सूचीबद्ध असलेल्या जुन्या उपकरप्राप्त इमारतींमधील पात्र भाडेकरू आणि रहिवाशांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ संजीव जयस्वाल (IAS) यांनी शुक्रवारी जाहीर केले की, आगामी काळात या इमारतींमध्ये रहिवाशांना अतिरिक्त क्षेत्रासाठी पूर्वीच्या ११०% ऐवजी रेडी रेकनर दराच्या १००%…
-

मुंबईतील वायू प्रदूषणावर बीएमसीची कठोर कारवाई; ८७८ जणांना कारणे दाखवा नोटिसा
•
वाढत्या वायू प्रदूषणाच्या गंभीर तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका (बीएमसी)ने शहरातील विविध बांधकाम प्रकल्पांवर कडक नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. फेब्रुवारी आणि मार्च २०२५ या कालावधीत वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी निर्धारित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ८७८ बांधकाम स्थळांना कारणे दाखवा नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. याचवेळी ४३८ प्रकल्पांना काम…
-

अमेरिकेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संलग्न संस्थेची ‘जातियवादावरील’ डॉक्युमेंटरी प्रदर्शित
•
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी जातिवादावर वारंवार भाष्य करत असून, या मुद्द्यावर विदेशांमध्येही आवाज उठवत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर, अमेरिकेतील इंडिक डायलॉग या संघटनेने एक डॉक्युमेंटरी प्रकाशित केली आहे. ही संस्था एका माजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सदस्याने सुरू केली आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये दावा करण्यात आले आहे की, भारतातील जातिवादाचे प्रमाण अतिरंजित…
-

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात नवविवाहित नौदल अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; लग्नाच्या चौथ्या दिवशीच आयुष्याला अलविदा
•
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात लेफ्टनंट विनय नरवाल या २६ वर्षीय भारतीय नौदल अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हृदयद्रावक बाब म्हणजे, ते आपल्या पत्नीसमवेत हनिमूनवर गेले असताना या हल्ल्यात बळी पडले. विशेष म्हणजे, त्यांचा विवाह अवघ्या चार दिवसांपूर्वीच झाला होता. हरियाणातील करनाल जिल्ह्याचे रहिवासी असलेले लेफ्टनंट नरवाल…
-

पहलगाम दहशतवादी हल्ला : “पंतप्रधान मोदीजी अत्यंत कठोर कारवाई करतील”- मुख्यमंत्री फडणवीस
•
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून, एकूण २६ लोकांचा जीव गेला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “दहशतवाद्यांना निश्चितच शिक्षा होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेच्या सूत्रधाराला शोधून काढतील आणि त्यांना उत्तर देताना अत्यंत कठोर कारवाई करतील.” हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये…
-

केईएममधील लैंगिक छळ प्रकरण : प्रा. डॉ. रवींद्र देवकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
•
केईएम रुग्णालयाच्या फॉरेन्सिक मेडिसिन व टॉक्सिकोलॉजी विभागातील प्राध्यापक डॉ. रवींद्र देवकर यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या लैंगिक छळप्रकरणी, मुंबई सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. डॉ. देवकर यांच्यावर एकूण सहा महिला डॉक्टरांनी अशोभनीय वर्तनाचे गंभीर आरोप केले आहेत. न्यायालयाचे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायाधीश गौरी कवडीकर यांनी २३ एप्रिल रोजी…
-

ई-बाईक टॅक्सी सेवेसाठी धोरण जाहीर; १५ किमी प्रवास मर्यादा, सीट सेपरेटर सक्तीची
•
राज्य सरकारने शहरांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सी सेवा सुरू करण्यास मान्यता दिल्यानंतर जवळपास तीन आठवड्यांनी गृह विभागाने या सेवेसाठी विस्तृत मार्गदर्शक धोरण जाहीर केले आहे. या नव्या धोरणानुसार, प्रत्येक प्रवासाची कमाल मर्यादा १५ किलोमीटर ठरवण्यात आली असून, प्रवासाचे भाडे संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरण निश्चित करणार आहे. या धोरणाखाली फक्त इलेक्ट्रिक दुचाकींनाच…
