-

महाराष्ट्र सीईटी सेलचा मोठा निर्णय : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतून १५१ विद्यार्थी बाद
•
मुंबई : राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मोठा वळण आला असून १५१ विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. महाराष्ट्र सीईटी सेलने (Maha CET Cell) तिसऱ्या फेरीतील एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेदरम्यान बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या आरोपावरून ही कारवाई केली आहे. पात्र उमेदवारांची नवीन यादी गुरुवारी जाहीर होणार आहे. ही कारवाई टाईम्स ऑफ…
-

मोबाईलवर कॉल येताच दिसणार कॉल करणाऱ्याचे नाव; टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
•
दूरसंचार विभागाकडून देशातील मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता लवकरच मोबाईलवर कॉल आल्यावर नंबरसोबत कॉल करणाऱ्याचे नावही दिसणार आहे. यासाठी टेलिकॉम कंपन्यांना एका आठवड्यात एका सर्कलमध्ये ही सेवा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सुविधेची 60 दिवस चाचणी घेतल्यानंतर ती देशभर लागू केली जाईल. कंपन्यांना दर…
-

प्राध्यापक भरतीला विलंब झाल्यास विद्यापीठांचे मानांकन घसरणार : मंत्री चंद्रकांत पाटील
•
मुंबई : राज्यातील विद्यापीठांमधील प्राध्यापक भरती प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे विद्यापीठांचे राष्ट्रीय मानांकन (रँकिंग) nacc आणखी खाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, प्राध्यापकांची रिक्त पदे तातडीने भरली नाहीत, तर शिक्षणाच्या गुणवत्तेवर तसेच संशोधनाच्या दर्जावर परिणाम होऊ शकतो. राज्यातील…
-

आता ब्लू इकॉनॉमीकडे भारताची झेप; १२ लाख कोटींच्या करारांवर शिक्कामोर्तब
•
मुंबई : भारताच्या सागरी विकासाला वेग देण्यासाठी आणि ‘ब्लू इकॉनॉमी’ला चालना देण्यासाठी तब्बल १२ लाख कोटी रुपयांचे करार मुंबईत झालेल्या इंडिया मेरिटाइम लीडर्स परिषद २०२५ मध्ये झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक कार्यक्रम पार पडला. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी ‘ब्लू इकॉनॉमी’ म्हणजेच सागरी अर्थव्यवस्थेचा…
-

नागपूरमध्ये बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलन; सरकारसोबत आज निर्णायक चर्चा
•
नागपूरमध्ये माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे राज्य सरकार आणि आंदोलकांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. ‘मुंबईला न जाता नागपूरमध्येच चर्चा व्हावी,’ असा ठाम पवित्रा प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी घेतला आहे. सरकारने चर्चेसाठी मुंबईत बोलावलं असलं तरी कडूंनी ते आवाहन फेटाळून लावत आंदोलन स्थळीच…
-

दिवाळीत लालपरीला लाभला सुवर्णकाळ; पुणे विभाग अव्वल, 301 कोटींचे विक्रमी उत्पन्न
•
दिवाळीच्या सुट्यांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) यंदा तब्बल 301 कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले असून, या कामगिरीत पुणे विभागाने अव्वल स्थान पटकावले आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली असून सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. 18 ते 27 ऑक्टोबर या दिवाळी…
-

पुण्यात एटीएसची कारवाई: उच्चशिक्षित IT इंजिनिअरला अटक, अल-कायदाशी संबंधांचा तपास
•
पुण्यात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई करत अल-कायदा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. जुबेर हंगरगेकर (वय ३५) असे आरोपीचे नाव असून, तो कोंढवा परिसरात राहत होता. हंगरगेकरकडे लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर, तसेच अल-कायदा ‘इन्स्पायर’ मासिकातील बॉम्ब तयार करण्याची आणि एके-४७ रायफल…
-

सरकार चर्चेला तयार, पण बच्चू कडू बैठकीला गैरहजर : बावनकुळे
•
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या ठिय्या आंदोलनाबाबत सरकार चर्चेस तयार असूनही कडू बैठकीला उपस्थित राहत नसल्याचे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. बावनकुळे म्हणाले, “आंदोलन सुरू झाल्यानंतर 26 तारखेला मी स्वतः बच्चू कडूंशी बोललो. 27 आणि 28 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री…
-

छत्रपती संभाजीनगरातून अमेरिकन नागरिकांची ऑनलाइन फसवणूक उघड, ११६ जणांना अटक
•
छत्रपती संभाजीनगर : अमेरिकन नागरिकांना कर चुकविल्याची भीती दाखवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शहरातील चिकलठाणा औद्योगिक परिसरातील एका चार मजली इमारतीत हे अवैध कॉल सेंटर चालवले जात होते. सोमवारी मध्यरात्री १.२० वाजता टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तब्बल ११६ जणांना अटक केली. या आरोपींमध्ये एक…
-

आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; जानेवारी २०२६ पासून अंमलबजावणीची शक्यता
•
नवी दिल्ली : केंद्र सरकारने अखेर आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, आयोगाला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी १ जानेवारी २०२६ पासून होण्याची शक्यता व्यक्त केली…
