-

युतीधर्म धोक्यात? बालाजी किणीकर यांचा भाजपला इशारा! “आमच्याकडेही यादी तयार आहे”
•
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असतानाच राज्यात पक्षबदलाचं सत्र जोरात सुरू झालं आहे. याच पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये मित्रपक्षांमध्येच राजकीय तणाव निर्माण झाला आहे. अलीकडेच शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांनी भारतीय जनता पक्ष मध्ये प्रवेश केला. यामुळे स्थानिक राजकारणात हलचल माजली आहे. 2015 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले यादव नंतर…
-

मनसेला आघाडीत घेण्यावरून राऊत–सपकाळांमध्ये तणाव; काँग्रेस हायकमांडकडे तक्रार
•
महाविकास आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) सामावून घेण्याबाबत मतभेद उफाळले आहेत. संजय राऊत यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात थेट काँग्रेसच्या हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सपकाळ यांनी मनसेला आघाडीत घेण्याबाबत नाराजी व्यक्त केल्याने हा वाद उफाळल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस वरिष्ठ नेत्यांना पत्र…
-

उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन, राजकीय चर्चांना उधाण
•
मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) दरवर्षी भव्य दीपोत्सवाचे आयोजन करते. यंदाच्या दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच दीपोत्सवावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. दरवर्षी दीपोत्सव…
-

भूपतीसह ६१ माओवादी आत्मसमर्पण, शहरी नक्षलवाद हेच खरं आव्हान : मुख्यमंत्री फडणवीस
•
गडचिरोलीत माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की बंदुकीचा नक्षलवाद संपत चालला असून आता शहरी नक्षलवाद हेच खरं आव्हान उरलं आहे. “अराजकतावाद्यांना आम्ही पराजित करू. संविधान न मानणाऱ्यांना बाबासाहेबांचं संविधान हरवेल,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. गडचिरोली पोलीस आणि राज्याच्या…
-

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील सर्व 12 आरोपींना जामीन
•
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात आज मोठा निर्णय झाला आहे. कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडून आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर या तिघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वीच या प्रकरणातील नऊ आरोपींना जामीन मिळाला होता. त्यामुळे आता या खटल्यातील सर्व 12 आरोपींना जामीन मंजूर…
-

मीरा-भाईंदर आणि ठाण्यात पॉड टॅक्सी धावणार; वाहतुकीला नवा वेग
•
मुंबई : मुंबईनंतर आता मीरा-भाईंदर आणि ठाणे या शहरांमध्ये पॉड टॅक्सी प्रकल्प उभारला जाणार असून, यामुळे उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होणार आहे. महामुंबईत हा प्रकल्प राबवण्यासाठी एमएमआरडीए (महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण) सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणार आहे. या प्रकल्पांतर्गत एका पॉडकॅबमध्ये सुमारे…
-

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य वाढवण्याची मागणी
•
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये प्रत्येकी पाच आणि पंचायत समित्यांमध्ये प्रत्येकी दोन स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्याची मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये एकूण १७० तर सर्व पंचायत समित्यांमध्ये ७०२ स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होईल. सध्या अस्तित्वात…
-

राज्यातील १० हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी; ‘विश्व विक्रमात नोंद होणार’ : एस.एम देशमुख
•
मुंबई : राज्यातील पत्रकारांच्या आरोग्याबाबत ऐतिहासिक उपक्रम राबवण्यात येणार आहे. ३ डिसेंबर २०२५ रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त एकाच दिवशी तब्बल १०,००० पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या उपक्रमाची नोंद विश्व विक्रमात होणार असल्याची माहिती परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी दिली. ३ डिसेंबर १९३९ रोजी…
-

‘ऑटो डाउनलोड’ सेटिंग ठरली महागात; व्यापाऱ्याच्या खात्यातून पावणेपाच लाख उडवले
•
जळगाव : मोबाईलवरील व्हॉट्सअॅपमधील ‘ऑटो डाउनलोड’ सेटिंग निष्काळजीपणे सुरू ठेवणे एका व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले. एका क्षणात त्याच्या बँक खात्यातील तब्बल ४ लाख ६४ हजार ३४२ रुपये गायब झाले. या घटनेमुळे सायबर सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा इशारा मिळाला आहे. अजंन कॉलनीतील निलेश हेमराज सराफ यांच्या व्हॉट्सअॅपवर मोबाईल रिपेअरिंग दुकानाच्या नावाने एक…
-

आयटीआरमधील फसवणुकीचा पर्दाफाश; राज्यातील हजारो शिक्षक आयकर विभागाच्या रडारवर
•
राज्यातील हजारो शिक्षक आता आयकर विभागाच्या तपासाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. शिक्षकांनी त्यांच्या आयकर विवरणपत्रांमध्ये (ITR) चुकीच्या कारणांवर आधारित परताव्याचे दावे केल्याचे उघड झाल्याने विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. कलम १३१(१ए) अंतर्गत शिक्षकांना समन्स बजावण्यात आले असून, त्यांना वैयक्तिकरीत्या उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या माहितीनुसार, अनेक शिक्षकांनी २०२१-२२…
