-

मुंबईत मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश
•
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मुंबईवर हल्ल्याची तयारी करणाऱ्या आयसीसशी (ISIS) संबंधित दहशतवाद्यांचा कट उधळून लावला आहे. आफताब अन्सारी आणि सूफियान अबुबकर खान या दोन दहशतवाद्यांना दिल्ली रेल्वे स्टेशनवरून अटक करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, हे दोघे मुंबईला रवाना होण्याच्या तयारीत होते. त्यांच्या ताब्यातून तीन पिस्तुलं, मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि आयईडी बनवण्याचे…
-

भारतात तीर्थयात्रा पर्यटनाला मोठी मागणी; मेक माय ट्रिपचा अहवाल
•
कोयंबतूर : भारतात पर्यटन उद्योगामध्ये तीर्थयात्रा पर्यटन हा वेगाने वाढणारा विभाग ठरत असल्याचे मेक माय ट्रिप या प्रवासी संस्थेच्या ‘पिल्ग्रिमेज ट्रॅव्हल ट्रेंड्स 2024-25’ या अहवालातून स्पष्ट झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षात ५६ प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये झालेल्या नोंदणीवरून १९ टक्क्यांची वाढ नोंदली गेली. यापैकी ३४ स्थळांनी दहापट वाढ दाखवली, तर १५ स्थळांनी…
-

अमेरिकेच्या नव्या कर प्रस्तावामुळे भारतीय आयटी उद्योगाला मोठा धोका
•
भारतीय आयटी उद्योगासाठी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेतील खासदार डॅरन अॅल्र्ड यांनी परदेशी कामगार नेमणाऱ्या कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा प्रस्ताव मांडला असून, याचा थेट फटका भारतीय कंपन्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हॉलीवूड इंटरनॅशनल रिलेशन्स अॅण्ड पब्लिक अफेअर्स कमिटीने या विधेयकाला हिरवा कंदील दिल्याने आता ते काँग्रेसमध्ये…
-

दादर कबुतरखाना : कबुतरांची संख्या घटली, दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला
•
मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दादरमधील ऐतिहासिक कबुतरखाना अखेर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. महापालिकेने तातडीने कारवाई करत परिसर सील केला असून पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे कबुतरांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. गेल्या काही वर्षांपासून कबुतरखान्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्यांवर अनेक वेळा तक्रारी होत होत्या.…
-

कुर्डू मुरूम उपसा प्रकरणी सविस्तर अहवाल मागवणार : मुख्यमंत्री फडणवीस
•
सोलापूर/मुंबई : माढा तालुक्यातील कुर्डू गावात बेकायदा मुरूम उपसा प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडवली आहे. या कारवाईदरम्यान डिवायएसपी अंजना कृष्णा यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या फोन संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वाद वाढला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवण्याचे आदेश…
-

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : प्रज्ञा ठाकूर व सहा जणांच्या निर्दोष सुटकेला न्यायालयात आव्हान
•
मालेगाव २००८ मधील भीषण बॉम्बस्फोट प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या प्रकरणात भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यासह सहा जणांना विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते. मात्र, या निर्णयाला आता पीडितांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आणि अनेक नागरिक जखमी…
-

उपराष्ट्रपती निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा मुद्दा; १५ खासदारांवर संशय
•
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर संसदेत आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विरोधी आघाडीचे उमेदवार बी. सुधाकर रेड्डी यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मतदानाआधीच रेड्डी यांना किमान ३१५ मते मिळतील, असा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात त्यांना केवळ…
-

माओवादी हल्ल्यात शहीद एएसपी यांच्या पत्नीची डीवायएसपी पदावर नियुक्ती
•
रायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा माओवादी हल्ल्यात शहीद झालेल्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक आकाश राव गिरेपुंजे यांच्या पत्नी सौ. स्नेहा गिरेपुंजे यांची राज्य पोलिस सेवेत उपअधीक्षक पदावर नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यंदा ९ जून रोजी आकाश राव गिरेपुंजे…
-

“पार्सियाना”, एक प्रसिद्ध पारशी मासिक ६० वर्षांनंतर बंद होणार
•
मुंबईच्या फोर्ट भागातील एका जुन्या निओ-गॉथिक इमारतीत, जी आता जीर्ण झाली आहे, तिथे चालतं देशातील सर्वात जुन्या आणि महत्त्वाच्या पारशी मासिकांपैकी एक – “पार्सियाना”. माझ्या आणि सुमेधाच्या “इंडियन एक्सप्रेस”मधील ज्येष्ठ सहकारी मिसेस वकील यांच्यामुळे आम्हाला “पार्सियाना” ची खरी ओळख झाली होती. शिवाय या मासिकाचे संपादक जहांगिर पटेल हे सुमेधाचे सेंट…
-

हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा; मनोज जरांगेंचा इशारा
•
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी हैदराबाद गॅझेटियरची तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा मोठा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मराठा आरक्षण बचाव आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. सोमवारी खडकी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. जरांगे म्हणाले की, हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठा-कुणबी समाजाचे अस्तित्व…
