-

जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय : मनोज जरांगे
•
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजासाठी सरकारने जारी केलेल्या नव्या जीआरवरून अनावश्यक संभ्रम निर्माण केला जात असल्याची टीका मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांनी केली. गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, जर या जीआरची अंमलबजावणी योग्य पद्धतीने केली, तर मराठा समाजाला प्रचंड फायदा होणार असून आरक्षणाच्या मागणीबाबत होणारे…
-

ओबीसींना ‘जीआर’चा धक्का नाही : मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
•
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात येईल, अशी चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टता केली आहे. “सरकारने सरसकट ओबीसींची मागणी मान्य केलेली नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री म्हणाले की, आतापर्यंत सरकारने केवळ वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी तात्पुरता निर्णय घेतला…
-

जीएसटीतील बदलामुळे सामान्यांना मोठा फायदा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
•
नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) व्यवस्थेत करण्यात आलेल्या व्यापक सुधारणा १ ऑक्टोबरपासून लागू होणार असून, यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी याबाबतची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, या सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळेल आणि भारताच्या विकासाला अधिक वेग येईल. नव्या व्यवस्थेनुसार जीएसटीचे टप्पे…
-

मुंबई उच्च न्यायालयात १४ नव्या न्यायमूर्तींनी घेतली शपथ
•
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी १४ अतिरिक्त न्यायमूर्तींनी पदाची शपथ घेतली. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या हस्ते हा शपथविधी पार पडला. केंद्र सरकारच्या कायदा व न्याय मंत्रालयाच्या शिफारशीवरून या नियुक्त्या झाल्या असून, सर्वोच्च न्यायालयाने १९ ऑगस्ट रोजी प्रस्तावास मंजुरी दिली होती. त्यानंतर केंद्र सरकारकडून २९ ऑगस्टला मान्यता मिळाली आणि…
-

मुंबईत ईद-ए-मिलादच्या सुट्टीत बदल; मुस्लिम संघटनांच्या बैठकीनंतर फडणवीस सरकारचा निर्णय
•
मुंबई: मुस्लिम समाजाचा महत्त्वाचा धार्मिक सण ईद-ए-मिलाद यंदा विशेष पद्धतीने साजरा होणार आहे. मात्र, यंदा या सणाच्या सुट्टीत मोठा बदल करण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांसाठी शुक्रवार, ५ सप्टेंबरऐवजी सोमवार, ८ सप्टेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून यासंदर्भात अधिसूचना जारी…
-

ठाणे जिल्ह्यातील छायाचित्रकारांसाठी सुवर्णसंधी; जिल्हा प्रशासनाची छायाचित्रण स्पर्धा जाहीर
•
ठाणे : ठाणे जिल्ह्याचे निसर्गसौंदर्य, समृद्ध संस्कृती आणि विकासाची झेप यांचे दर्शन घडविण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने ‘छायाचित्रण स्पर्धा २०२५’ जाहीर केली आहे. या स्पर्धेमुळे हौशी, नवोदित, व्यावसायिक छायाचित्रकारांसह विद्यार्थी, नागरिक आणि शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना आपली कला सादर करण्याची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना चार विषयांवर आधारित छायाचित्रे सादर…
-

मुंबईच्या पाणी संकटावर बीएमसीचे मोठे पाऊल; गारगाई-पिंजाळ धरणांसह डिसॅलिनेशन प्रकल्प प्रस्तावित
•
मुंबई : २०४१ पर्यंत मुंबईची दैनंदिन पाण्याची मागणी तब्बल ६,५३५ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. सध्या बीएमसी ४,००० एमएलडी पाणीपुरवठा करते, परंतु ५०० एमएलडीची कमतरता आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे ही तफावत आणखी ५० टक्क्यांनी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर उपाय म्हणून बीएमसीने दोन महत्त्वाकांक्षी जल प्रकल्पांना…
-

एमआयडीसी जमीन वाटपासाठी ‘एमआयएलएएपी’ पोर्टलचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन
•
मुंबई : महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि गुंतवणूकदारांसाठी सुलभ वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एमआयडीसी औद्योगिक जमीन अर्ज आणि वाटप पोर्टल (एमआयएलएएपी) लाँच केले. या पोर्टलद्वारे गुंतवणूकदारांना उपलब्ध औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी भूखंडांचा तपशीलवार आढावा घेता येणार आहे. वापरकर्ता-अनुकूल इंटरफेसमुळे…
-

माझ्या आईचा अपमान म्हणजे सर्व मातांचा अपमान – पंतप्रधान नरेंद्र मोदी
•
नवी दिल्ली – काँग्रेस-राजद आघाडीच्या व्यासपीठावरून त्यांच्या आईविषयी करण्यात आलेल्या अवमानासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली. “माझ्या आईला शिवीगाळ करणे हा फक्त माझ्या आईचाच नाही, तर देशातील प्रत्येक मातांचा अपमान आहे,” असे मोदी म्हणाले. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत बोलताना मोदी म्हणाले की, त्यांच्या आईने अत्यंत साधेपणात…
-

मराठा आंदोलनकांवरील गुन्हे या महिनाअखेर मागे घेतले जाणार
•
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनांदरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे चालू महिन्याअखेरपर्यंत मागे घेण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय (जीआर) मंत्रिमंडळ उपसमिती आणि आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या चर्चेदरम्यान काढण्यात आला. सरकारने आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना मदत आणि नोकरी देण्याची कार्यवाही…
