-

न्यायाधीशांसमोर संतोष देशमुखांवरील अमानुष मारहाणीचे व्हिडीओ सादर, पत्नी व भावाला अश्रू अनावर
•
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांची कशा पद्धतीने निर्घृण हत्या केली, याचे थरकाप उडवणारे पुरावे न्यायालयासमोर सादर केले. सरकारी वकिलांनी न्यायाधीशांसमोर संतोष देशमुख…
-

देवडी येथे अ.भा.पत्रकार परिषदेचा सोहळा; वरिष्ठ पत्रकार आणि राज्यभरातील सदस्यांची असणार उपस्थिती
•
बीड : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची विस्तारित कार्यकारिणी बैठक, ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार आणि स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण असा भव्य कार्यक्रम रविवार, २४ डिसेंबर २०२५ रोजी बीड जिल्ह्यातील देवडी येथील माणिकबागेत आयोजित करण्यात आला आहे. ही माहिती परिषद पदाधिकारी एस. एम. देशमुख यांनी दिली. या…
-

वृध्देश्वराचा वाढदिवस
•
गेली ६६ वर्षं भारतीय राजकारणात सतत कार्यरत असणाऱ्या, राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मा.शरद पवार यांचा आज ८५ वा वाढदिवस. असंख्य उन्हाळे – पावसाळे अंगावर झेलणार्या या “वृध्देश्वरास” वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. सलग अर्धशतकाहून अधिक काळ राजकारणाच्या केंद्रभागी राहणं, ते वेगवान सत्ताकारण स्वतः भोवती फिरवत ठेवणं ही अशक्यप्राय गोष्ट. पण शरद…
-

१९९८ ची लोकसभा निवडणूक : शिवराज पाटील चाकुरकर आणि शरद पवार
•
माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्या निधनाने आज एका प्रदीर्घ राजकीय वाटचालीचा शेवट झाला आहे. राष्ट्रीय पातळीवर कायम मोठी पदे भूषविणारे शिवराज पाटील चाकुरकर, कायम कॉंग्रेस ‘हाय कमांड’चे जवळचे नेते म्हणुन प्रसिद्ध होते. उच्चविद्याविभूषित चाकूरकर यांनी, धोतर-टोपीवाल्या महाराष्ट्राच्या राजकारणात, टापटीप राहण्याची, खासकरून सफारी आणि पांढर्या शुभ्र बुटाची स्टाइल आणली. जिचे…
-

देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे 91 व्या वर्षी निधन
•
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. लातूरच्या राजकारणातील एक प्रभावी व केंद्रस्थानी असलेले नेते म्हणून त्यांची ओळख होती. स्थानिक ते केंद्र अशा व्यापक पातळीवर त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळत भारतीय राजकारणावर मोठी छाप उमटवली. चाकूरकर दिल्लीहून आपल्या परिवारातील विवाह…
-

राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची स्थिती स्पष्ट
•
राज्यात नगर परिषद आणि नगर पालिका निवडणुका पार पडल्यावर आता महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुका “मिनी विधानसभा” ठरणार असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्यातील २९ महापालिका आणि १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी प्राथमिक हालचाली सुरू झाल्या असून, उर्वरित जिल्हा परिषदांच्या…
-

लातूर–मुंबई प्रवासात क्रांती! फडणवीसांची मोठी घोषणा : प्रवास वेळ थेट ११ तासांवरून ५ तासांवर
•
मराठवाड्याच्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. लातूरहून मुंबईला रस्तेमार्गे जाण्यासाठी लागणारा तब्बल ११ तासांचा प्रवास आता फक्त ४.५ ते ५ तासांत होणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ‘NDTV मराठी’च्या अनस्टॉपेबल महाराष्ट्र कार्यक्रमात त्यांनी शक्तिपीठ महामार्ग आणि राज्यातील सुरू असलेल्या इतर महत्वाच्या रस्ते प्रकल्पांमुळे हा बदल…
-

गोवा नाईटक्लब दुर्घटनेला मोठे वळण: पळून गेलेले लुथरा बंधू थायलंडमध्ये पकडले
•
गोव्यातील बर्च नाईटक्लबला ६ डिसेंबर रोजी लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सुरू असलेल्या तपासाला मोठे वळण मिळाले आहे. आगीच्या पाचव्या दिवशी क्लबचे सहमालक सौरभ आणि गौरव लुथरा यांना थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. थायलंड पोलिसांनी हातकड्यांसह आणि त्यांच्या पासपोर्टसह दोघांचे फोटो जाहीर केले आहेत. आगीची घटना घडत असताना…
-

राज्यात थंडीची लाट तीव्र; अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात घसरला
•
राज्यातील मोठ्या भागात पारा झपाट्याने घसरत असून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र याठिकाणी थंडीची लाट अधिक तीव्र झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस थंडीचा जोर कायम राहणार असून किमान तापमान आणखी २ ते ३ अंशांनी घसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर तापमानात पुन्हा २ ते…
-

२०२६ साठी राज्यातील २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर; भाऊबीजला अतिरिक्त सुट्टी
•
महाराष्ट्र शासनाने २०२६ वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी एकूण २४ सार्वजनिक सुट्ट्यांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ११ नोव्हेंबर २०२६ (बुधवार) रोजी येणाऱ्या भाऊबीजेसाठी अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय घेतला असून, सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. जाहीर करण्यात आलेल्या सुट्ट्यांमध्ये प्रामुख्याने प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महात्मा गांधी…
