-

मराठा समाजासाठी कोर्टात टिकणारा तोडगा काढला : फडणवीस
•
नागपूर : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, मराठा समाजाला न्यायालयात टिकेल असा आरक्षणाचा फायदा मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. समाजाची दिशाभूल करणाऱ्यांना अनुसरू नये, असे आवाहन त्यांनी केले. फडणवीस म्हणाले, “ओबीसींवर अन्याय न होता मराठा समाजालाही न्याय मिळवून देऊ. कितीही शिव्या मिळाल्या किंवा अपमान…
-

सेमीकंडक्टरच्या भविष्यासंदर्भात जगाचा भारतावर विश्वास – पंतप्रधान मोदी
•
नवी दिल्ली : सेमीकंडक्टर उद्योगाच्या भविष्यासंदर्भात जगाचा ठाम विश्वास भारतावर बसला आहे. या क्षेत्रात भारताची वाढती भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. दिल्लीमध्ये सुरू झालेल्या सेमिकॉन इंडिया शिखर परिषद-२०२५ चे उद्घाटन करताना ते बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भारत आता फक्त चिप निर्मितीत मर्यादित…
-

हैदराबाद गॅझेटियर निर्णायक ठरणार का?
•
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी १९१८ मध्ये निजामशाही काळात प्रसिद्ध झालेला हैदराबाद कृषिकस्तक प्रोफेशनल गॅझेटियर हा दस्तऐवज आता केंद्रस्थानी आला आहे. या गॅझेटियरमध्ये मराठा समाजाला शेतकरी असून कुणबी प्रवर्गात समाविष्ट मानले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी हा ऐतिहासिक पुरावा निर्णायक ठरू शकतो, असे मानले जात आहे. गॅझेटियरमध्ये मराठा समाजाचे वर्णन करताना…
-

आता एसटी महामंडळाची अतिरिक्त जमीन ९९ वर्षांसाठी लीजवर
•
मुंबई : राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या मालकीच्या पण अतिरिक्त असलेल्या जमिनीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता या जमिनी सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (PPP) ९९ वर्षांसाठी लीजवर दिल्या जाणार आहेत. सोमवारी हा शासननिर्णय काढण्यात आला असून या निर्णयामुळे महामंडळाला दरवर्षी कोट्यवधींचा उत्पन्नवाढीचा फायदा होईल, असा दावा करण्यात आला आहे. याआधी अशा जमिनी ३०…
-

तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून वाद पेटला; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
•
तुळजापूर : श्री तुळजाभवानी पुजारी मंडळावरून पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. मंडळाच्या कार्यप्रणाली व आर्थिक व्यवहारांवर गंभीर आरोप झाले असून, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने आले आहेत. या प्रकरणामुळे तुळजापूरमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. माजी सभासद किशोर आयाचितकर यांनी धर्मादाय आयुक्तालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पुजारी मंडळाच्या कारभारात मोठ्या…
-

व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार; लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस
•
मुंबई : लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळातील व्हीआयपी आणि सामान्य भक्तांसाठी ठेवण्यात आलेल्या वेगवेगळ्या दर्शन व्यवस्थेबाबत अन्यायकारक भेदभाव होत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने मंडळाला तसेच राज्य प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे. सहा आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाने…
-

ट्रान्सजेंडर समावेशक लैंगिक शिक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला नोटीस
•
नवी दिल्ली : शालेय अभ्यासक्रमात ट्रान्सजेंडर समावेशक सर्वांगीण लैंगिक शिक्षण (सीएलई) समाविष्ट करण्याबाबत दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. न्यायालयाच्या खंडपीठाने केंद्र सरकार, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) तसेच महाराष्ट्रासह काही राज्य सरकारांना नोटीस बजावली आहे. विद्या गर्ग आणि नयन तारा गुहा यांनी दाखल…
-

3 वाजेपर्यंत जागा रिकामी करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू : हायकोर्टाचा अल्टिमेटम
•
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनावर आज हायकोर्टात सुनावणी झाली. मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने आंदोलकांचे सुरू असलेले आंदोलन बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत कठोर शब्दांत राज्य सरकारला तंबी दिली. कोर्टाने सांगितले की, आझाद मैदानावर केवळ ५ हजार…
-

दहावीत शिकणाऱ्या मुलीची शाळेसमोरच चाकूने भोसकून हत्या
•
नागपूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा असतानाही नागपूरमध्ये दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची तिच्याच शाळेसमोर चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना अंजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे कॉलनीतील अंजनी शाळेजवळ घडली. मृत विद्यार्थिनीचे नाव अँजेल जॉन (कौशल्यनगर, नॅप्र) असे आहे. आरोपी हा अल्पवयीन असून तो पीडितेच्या शाळेचा माजी विद्यार्थी…
-

घुसखोरांना रोखण्यासाठी सीमारेषेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
•
नवी दिल्ली : भारतात होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी अमेरिकेसारखी सीमारेषेवर भिंत उभारण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे का, असा थेट सवाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला केला. या प्रश्नामुळे पुन्हा एकदा बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीचा मुद्दा चर्चेत आला आहे. बांगाली, पंजाबी भाषिक सारख्या समाजघटकांचे सांस्कृतिक बंधन सीमापार टिकवणे महत्त्वाचे आहे, मात्र या…
