-

तुळजाभवानी मंदिरात आजपासून पुन्हा जवळून दर्शनाची सुविधा
•
मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार अरविंद बोळगे यांनी सांगितले की, भाविकांना आता चोपदार दरवाज्यापासून कमी वेळेत दर्शनाची सोय उपलब्ध होणार आहे.
-

राज ठाकरे यांचे वक्तव्य: ‘रस्ते बनवणं हा आपल्याकडे धंदा, ते खराब झालेच पाहिजेत’
•
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील खराब रस्त्यांवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ‘रस्ते बनवणं हा आपल्याकडे धंदा आहे, ते खराब झालेच पाहिजेत’ असं वक्तव्य केलं, ज्यामुळे सध्या ते चर्चेत आहेत. भ्रष्टाचाराचा आरोप…
-

‘नथुराम गोडसे व्हावे लागेल’ या धमकीनंतर थोरातांच्या समर्थनार्थ संगमनेरात मोर्चा
•
राज्यातील राजकारण आणि अध्यात्मिक क्षेत्रातील एका मोठ्या वादाची सुरुवात झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील घुलेवाडी गावात हरिनाम सप्ताहादरम्यान झालेल्या वादावरून, कीर्तनकार संग्राम महाराज भंडारे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना “नथुराम गोडसे व्हावे लागेल” अशी धमकी दिली. या धमकीनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नेमका वाद…
-

सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियमने मुंबई उच्च न्यायालयासाठी १४ नव्या न्यायाधीशांची शिफारस
•
मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी १४ नव्या नावांची शिफारस केली आहे. यामध्ये सर्व वकीलांचा समावेश असून, केंद्र सरकारने नावे मंजूर केल्यानंतर आणि राष्ट्रपतींच्या शिक्कामोर्तबाखाली नियुक्तीची अंतिम अधिसूचना जारी झाल्यानंतरच त्यांची प्रत्यक्ष नियुक्ती होईल. भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई, जे मे महिन्यापासून कॉलेजियमचे नेतृत्व करत आहेत, यांनी…
-

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला, आरोपी ताब्यात
•
दिल्ली : राजधानीच्या राजकारणाला हादरा देणारी घटना बुधवारी घडली. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर त्यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या जनता दरबारात हल्ला केला. आरोपीने प्रथम दगडफेक करण्याचा प्रयत्न केला, मात्र नेम चुकल्याने मुख्यमंत्र्यांना इजा झाली नाही. त्यानंतर त्याने थेट गुप्ता यांच्या कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून आरोपीला…
-

ऑनलाइन गेमिंगवर केंद्राची कडक नजर; विधेयकाला मंजुरी
•
नवी दिल्ली : देशात वाढत्या ऑनलाइन बेटिंग अॅप्स आणि सेलिब्रिटींमार्फत होणाऱ्या जाहिरातींमुळे मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंग संदर्भातील महत्त्वाचे विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकाचा उद्देश भारतीय ऑनलाइन गेमिंग क्षेत्राचे नियमन करणे आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे होणाऱ्या फसवणुकीला आळा घालणे हा आहे. लवकरच हे विधेयक लोकसभेत…
-

मराठवाड्यात २२ महिन्यांत २ लाख ३६ हजार कुणबी जात प्रमाणपत्रे वाटप
•
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात गेल्या २२ महिन्यांत तब्बल २ लाख ३६ हजार ५२ कुणबी जात प्रमाणपत्रे नागरिकांना देण्यात आली आहेत. ९ नोव्हेंबर २०२३ पासून ३१ जुलै २०२५ पर्यंत ही प्रक्रिया पार पडली असून, दरमहा सरासरी दहा हजारांहून अधिक प्रमाणपत्रे दिली गेल्याची माहिती समोर आली आहे. सरकारने कुणबी समाजासाठी दिलेल्या आरक्षणाच्या…
-

मुंबईकरांसाठी येणार २६८८ एसी रेल्वे –प्रवाशांना मोठा दिलासा
•
मुंबई : राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासासंदर्भातील अनेक महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीत मुंबई व राज्यातील प्रवाशांना दिलासा देणारे पाच मोठे निर्णय जाहीर करण्यात आले असून त्याचा थेट फायदा लाखो प्रवाशांना होणार आहे. उपनगर रेल्वे सेवेत प्रवाशांच्या वाढत्या ताणाचा विचार करता एकूण २६८८ एसी…
-

आईच्या गर्भाशिवाय रोबोटच्या पोटात वाढणार बाळ; चीनचा अजब प्रयोग
•
शांघाय : चीनमधील शास्त्रज्ञांनी असा क्रांतिकारी प्रयोग सुरू केला आहे, ज्यामुळे भविष्यात आईच्या गर्भाशिवाय बाळ जन्माला येऊ शकते. नानजिंग टेक्नॉलॉजिकल विद्यापीठातील डॉ. झांग यांच्या नेतृत्वाखालील टीमने जगातील पहिला “बाळ वाढवणारा रोबोट” तयार केला असल्याची माहिती समोर आली आहे. या यंत्राच्या सहाय्याने बाळाला पूर्ण नऊ महिने कृत्रिम पिशवीत ठेवून सुरक्षित वाढवले जाऊ…
-

नवी मुंबईत ‘पंतप्रधान एकता मॉल’ची उभारणी; राज्य सरकारकडून समितीची स्थापना
•
मुंबई: देशातील विविध राज्यांचे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबईच्या उलवे येथे ‘पंतप्रधान एकता मॉल’ची उभारणी करण्यात येणार आहे. सिडकोमार्फत हा मॉल बांधला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘अनेकांत एकता’ या विचारातून ही संकल्पना पुढे आली असून, प्रत्येक राज्यात असा एक मॉल उभारण्याचे…
