मुंबई : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशाच्या सीमाभागावर तणाव पाहायला मिळत आहे. याचं पार्श्वभूमीवर भारतात सायबर हल्ल्याबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. एका अहवालानुसार मागील एका आठवड्यात भारतावर 10 लाख पेक्षा जास्त सायबर हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय रेल्वे, बँकिंग नेटवर्क्स आणि सरकारी पोर्टल्सना महाराष्ट्र सायबर विभागाने अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे फक्त हल्ले नाहीत तर संघटित सायबर युद्धासारखी स्थिती असल्याचं अधिकाऱ्याचं म्हणणं आहे.
सैनिकी शाळांच्या संकेतस्थळांना केलं टार्गेट
महाराष्ट्र सायबर सेलच्या ‘इकोज ऑफ पहलगाम” या अहवालानुसार, २३ एप्रिलपासून जवळपास १० लाख सायबर हल्ल्यांची देशभरात नोंद झाली आहे. यामागे सायबर गुन्हेगारांची मोठी टोळी असावी, असा संशय विभागाला आहे. दहशतवाद्यांच्या कटाचा हा भाग असल्याचे अधिकाऱ्यांचं म्हणणे आहे. या टोळीने भारतीय सैनिकी शिक्षण संस्था, सैनिक कल्याण पोर्टल्स आणि अनेक सैनिकी शाळांच्या संकेतस्थळांना ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न केला आहे. यातील
‘बहुसंख्य हल्ले उधळून लावण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.
सायबर विभागाने पहलगाम सायबर वॉरफेअर हा दुसरा अहवाल तयार केला आहे. या हल्ल्यात सायबर हल्लेखोरांची नवीन मोडस ऑपरेंडी समोर आली आहे. यामध्ये ‘एपीटी ३६” या नवीन गटाची माहिती मिळाली आहे, हा गट पाकिस्तानातून सक्रिय असल्याचा संशय आहे. त्यांनी आयपी ऑॅड्रेस बंद केले असून ते बल्मेरियामधून काम
करत असल्याचं दिसून येत आहे. या टोळीने हुबेहूब सरकारी पत्र तयार केले आहे. त्यामध्ये त्यांनी मॉलवेअर लपवले आहे. यावर क्लिक करताच सर्व डाटा चोरी होऊ शकतो. हे वेगवेगळे ग्रुप एकमेकांना संपर्कात राहून हल्ले करत आहेत.
वेबसाइट डिफेसमैंट, कंटैंट मॅनेजमेंट सिस्टीम एक्सप्लॉयटेशन आणि कमांड अँड कंट्रोल (सी). यापैकी सर्वाधिक हल्ले वेबसाइट डिफेसमेंटवर झाले आहेत. हे सायबर हल्ले पाकिस्तान, मोरोक्को, इंडोनेशिया आणि मध्यपूर्वेतील देशांमधून होत आहेत. या हल्ल्यात सामील टोळीला विशिष्ट नाव देण्यात आले आहे. त्यातील ‘टीम इन्सेन पीके” हा पाकिस्तानस्थित गट सर्वाधिक हल्ले करीत असल्याचा संशय आहे
‘मिस्टेरियस टीम बांग्लादेश’ व इंडोनेशियातील “इंडो हॅक्स सेक्शन’ या गटांनी भारतीय दूरसंचार डेटा प्रणाली व प्रशासकीय पोर्टल्सवर हल्ला केला आहे.
Leave a Reply