मुंबई – भाजप नेत्या तथा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार सुरेश धस यांची पक्ष श्रेष्टीकडे तक्रार केल्याची माहिती स्वतः मुंडे यांनी दिली. विधानसभेचं निकाल लागल्यापासून सुरेश धस हे सातत्याने पंकजा मुंडे यांच्यावर टीका करत होत्या. यावर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या “ते माझ नाव घेऊन जी चर्चा करतायत, त्यावर मी माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. ज्या विषयाशी कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं, टिप्पणी करणं त्यांच्याकडून अपेक्षित नाही. पक्षाच्या भूमिकेला ठेच पोहूच नये, म्हणून मी चार-पाच महिने गप्प बसले, पण आता पक्षश्रेष्ठींना विनंती केलीय की, त्यांना समज द्यावी” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या आरोपावर काय म्हणाल्या मुंडे?
आपण विधानसभेला त्यांच्या विरोधात काम केलं, असा धस यांचा आरोप आहे.त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या “मी प्रचार केलाय की नाही तुम्ही रेकॉर्डवर जाऊन पहा . या राज्यात अनेक लोक भाजपशी निगडीत होते, ते अपक्ष उभे राहिले. मंचावर जाऊन मतदानाची मी विनंती केलेली आहे. त्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे” “त्यांनी असा आरोप करायला नको होता. प्रचार करताना त्यांनी माझ्याशिवाय दुसऱ्या कुठल्या नेत्याचं नाव घेतलं नाही. त्यामुळे निकाल लागल्यावर असे आरोप करणं, जो व्यक्ती 75 हजार मतांनी निवडून आलाय, काम केलं नाही, तर कसं शक्य होईल याचं त्यांनी आत्मपरिक्षण करावं” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
“लोकसभेला जे माझं लीड होतं, ते अर्ध्यापेक्षा कमी झालं, मग त्यांनी माझं काम केलं नाही असं म्हणायच का?. त्यांनी जाहीरपणे असं बोलण हे पक्ष श्रेष्ठींना, पक्ष शिस्तीला मान्य नाही. निवडून आल्यावर त्याच गुलालात माझ्या विषयी बोलले. विधानसभेचा निकाल 23 नोव्हेंबरला लागला तेव्हापासून 12 मार्च म्हणजे आजपर्यंत बोलण्याच टाळलं. पक्षश्रेष्ठींना विनंती केलीय की, त्यांना समज द्यावी हे खरं आहे” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
Leave a Reply