दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयाने बलात्कारासंदर्भात दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत, हा निकाल असंवेदनशील आणि अमानुष पद्धतीचा आहे, असं म्हटलं आहे. एखाद्या महिलेचे स्तन धरणे, तिच्या पायजम्याची नाडी सोडणे या कृत्यांना बलात्कार म्हणता येणार नाही, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर याबाबत विविध पातळीवरून टीका व्हायला सुरू झाली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने देखील खालच्या न्यायालयाला फटकारले आहे असून संबंधित न्यायाधीशांवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की, या अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल अतिशय असंवेदनशील, अमानुष पद्धतीचा आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून ज्या न्यायमूर्तींनी हा निर्णय दिला त्यांनी प्रचंड असंवेदनशीलता दाखवली, आम्हाला सांगायला अतिशय दुःख वाटते की, निकाल लिहिणाऱ्यांमध्ये संवेदनशीलतेचा पूर्णपणे अभाव होता, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. अशा प्रकारचा दिलेला निकाल हे अतिशय गंभीर प्रकरण असल्याचे सर्च्चन्यायालयाचे न्या. भूषण गवई व न्या. ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या
खंडपीठाने म्हटले आहे.
बलात्काराच्या एका प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या अतिशय वादग्रस्त निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेऊन त्याला बुधवारी स्थगिती दिली. खंडपीठाने म्हटले आहे की, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या
निकालाच्या ११, २४, २६ परिच्छेदांतील निरीक्षणे कायद्यातील तरतुदीपेक्षा विसंगत आहेत, त्यामुळेच आम्ही या निकालाला स्थगिती देत आहोत, असं न्यायाधीशांनी सांगितले. आता या प्रकरणाची दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे.
नेमका प्रकार काय?
10 नोव्हेंबर 2021 रोजी एक महिला तिच्या 18 वर्षाच्या मुलीसह तिच्या मेहुणीच्या घरून परतत
होती. त्यावेळी गावातील पवन, आकाश आणि अशोक यांनी दोघींना आपल्या मोटारसायकलवर लिफ्ट दिली. त्यावेळी आरोपींनी या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यानंतर याप्रकरणी पॉक्सो विशेष न्यायालयात या
मुलीच्या आईने दाद मागितली. समन्स बजावल्यानंतर त्या विरोधात आरोपीनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राम मनोहर वर्मा यांनी निकाल देताना महिलेच्या पैजाम्याची नाडी सोडणे आणि स्तन धरणे बलात्कार होत नाही, असा वादग्रस्त निकाल दिला होता.
Leave a Reply