Tag: Maharashtra Research Center
-
एटीएममधून पैसे काढणे 1 मे पासून महागणार; अशी आहे शुल्कवाढ
•
1 मे पासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता अधिकचे पैसे द्यावे लागणार आहे. इतकंच नाही तर बॅलन्स तपासल्यावर देखील शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे एटीएम वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने एक अधिसूचना जारी करून इंटरचेंज फीमध्ये वाढ जाहीर केली आहे. कसं आकारले जाणार शुल्क? १…
-
२५ वर्षांत पाणी प्रश्न सुटला नाही; उद्धव सेनेची अप्रत्यक्ष कबुली
•
मुंबई शहरामध्ये सध्या सुरू असलेल्या पाण्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने महापालिकेच्या विभागीय कार्यालयांवर आंदोलने छेडली आहेत. मात्र, ही आंदोलने पाणी प्रश्नाच्या निराकरणासाठी कमी आणि पक्षातील निष्क्रियतेवर झटक देण्यासाठी अधिक असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या २५ ते ३० वर्षांपासून मुंबई महापालिकेवर सत्तेत असलेल्या या पक्षाने…
-
चीनमधील मॅरेथॉनची जगभरात चर्चा; 12 हजार माणसांसोबत धावले 20 रोबोट्स
•
चीनमधील यिझुआंगमध्ये झालेल्या मॅरेथॉनची चर्चा सध्या जगभरात होतीय. त्याचं कारण म्हणजे या मॅरेथॉनमध्ये माणसांसोबत रोबोटही धावले. होय यिझुआंगमध्ये झालेल्या मॅरेथॉनमध्ये 12 हजार माणसांसोबत 20 रोबोट्सही धावले. त्यातही महत्वाचं म्हणजे ही मॅरेथॉन जिंकली ती हाडा मासाच्या मानवी धावपटूने. यिझुआंग प्रांत म्हणजे चीनमधील अनेक मोठमोठाल्या टेक फर्म्सचा बालेकिल्ला मानला जातो. तिथे झालेल्या…
-
“कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येणं हा आमचा अंतर्गत प्रश्न; अजित पवार स्पष्टच बोलले
•
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील अनेक मतभेदाच्या बातम्या झाल्या. राजकीय व्यासपीठावर दोघांनी एकमेकांवर टीका केली. त्यामुळे कौटुंबिक कार्यक्रमात हे दोघे एकत्र येतील का? अशी अनेकदा चर्चा झाली आणि अजित पवार यांचा मुलगा जय पवार याच्या साखरपुड्याला शरद पवार उपस्थित होते. आता यावर अजित पवार यांनी…
-
मित्रहो, ही कुठली पत्रकारिता?
•
मराठी पत्रकारिता कुठल्या वळणावर पोहोचली आहे, हे मी पत्रकार असल्यामुळे जास्त कधी बोलत नाही. पण मराठी पत्रकारितेत झालेला हा लक्षणीय बदल अस्वस्थ करणारा आहे. त्यामुळे बोलावसं वाटलं. तुम्हीच पहा, आपल्या पत्रकारितेची घसरण दर्शविण्यासाठी आजच्या पुढील दोन बातम्या पुरेशा आहेत… माझ्यासाठी त्या बातम्या नसून, मन हादरवून टाकणारे पत्रकारितेचे विदारक स्वरुप आहे……
-
•
मुंबई : श्रीलंकेतील व्यापार विषयक संधी आणि पर्यटन याविषयावर ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीच्यावतीने 23 एप्रिल रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कोलाबास्थित ताज हॉटेलमधील रॉयल मुंबई यॉट क्लबच्या अँकरेज रूममध्ये पार पडणार आहे. दरम्यान श्रीलंकेच्या प्रभारी वकिलात प्रमुख हे श्रीलंकेमधील प्रगतीचा आढावा घेणारे प्रेझेंटेशन सादर…
-
छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप खरे हिरो, औरंगजेब नाही : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
•
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी ठणकावून सांगितले की, काही लोक औरंगजेबाचे महिमामंडन करून त्याला हिरो बनवण्याचा प्रयत्न करत असले तरी, त्याने प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त करणारा, हिंसक आणि अत्याचारी शासक कधीही आपला नायक होऊ शकत नाही.ते कॅनॉट गार्डन परिसरातील शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी बोलत होते. मुख्यमंत्री…
-
राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंसोबत युतीचे संकेत म्हणाले, “आमचे वाद किरकोळ…”
•
राज्यातील सध्याच्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संभाव्य युतीबाबत सूचक भाष्य केल्याने चर्चेला उधाण आले आहे. सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव मे ट्रुथ’ या…
-
अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांवर संकट;रद्द झालेल्या व्हिसामध्ये ५०% भारतीयांचा समावेश
•
अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने परदेशी विद्यार्थ्यांविरोधात कारवाईचा सपाटा सुरूच ठेवला असून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय विद्यार्थी अडकल्याचे समोर आले आहे. या कारवाईमुळे भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.अमेरिकेतील स्थलांतर वकिलांच्या संघटनेने (एआयएलए) केलेल्या अहवालानुसार ३२७ जणांचे व्हिसा रद्द केल्याच्या प्रकरणातील सुमारे निम्मे म्हणजेच ५० टक्के विद्यार्थी भारतीय आहेत.भारतीय…
-
जेएनयूमध्ये हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी निवडणुका तात्पुरत्या स्थगित
•
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या वादग्रस्त घटनांमुळे व निवडणूक कार्यालयात झालेल्या तोडफोडीच्या व धक्काबुक्कीच्या प्रकारांमुळे अखेर विद्यार्थी संघटनांच्या निवडणूक प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. १८ एप्रिल २०२५ रोजी निवडणूक समितीने यासंदर्भात अधिकृत नोटीस प्रसिद्ध केली. निवडणूक समितीने आपल्या अधिसूचनेत नमूद केले आहे की, विद्यापीठ परिसरात…