ठाणे महापालिकेचे बाईक ॲम्बुलन्स पार्किंगमध्ये धूळखात पडलेल्या अवस्थेत; नागरिकांमधून रोष

ठाणे : महानगरपालिकेने सुरू केलेल्या बाईक ॲम्बुलन्स पार्किंगमध्ये धूळखात पडलेल्या अवस्थेत पडल्याचं समोर आलं आहे. जवळपास 20 पेक्षा जास्त बाईक्स पार्किंगमध्ये धुळीत पाहायला मिळत आहेत. शिवसेने उबाठा गटाचे पदाधिकारी अनिष गाढवे यांनी हा सगळा प्रकार समोर आणला आहे. त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवर बाईक ॲम्बुलन्स कशाप्रकारे पार्किंगमध्ये धूळखात पडल्या आहेत, हे आपल्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. “आरोग्यवस्थेच्या गोंडस नावाखाली तुमच्या माझ्या टॅक्सची कशाप्रकारे विल्हेवाट ठाणे महापालिका प्रशासन लावत आहे, एकदा हा नमुना पहाच. ज्या कोणाच्या डोक्यात ॲम्बुलन्स बाईकची भन्नाट कल्पना सुचली असेल त्याला 21 तोफांची सलामी. खिसे नेमके कोणाचे भरले? ठाणेकरांनो बघा आणि थंड बसा.” असं अनिष गाढवे यांनी आपल्या व्हिडीओखाली लिहलं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला.

 

ठाणे येथे जलद वैद्यकीय मदत देण्यासाठी टीएमसीने सुरू केलेल्या बाईक रुग्णवाहिका गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळ कुजलेल्या अवस्थेत आहेत. जीव वाचवण्याऐवजी या रुग्णवाहिका बंद पडून राहिल्याने करदात्यांचे पैसे वाया गेले आहेत. शेतकरी कामगार पक्षाने (शेतकरी कामगार पक्ष) टीएमसी अधिकारी आणि राजकीय नेत्यांवर मोठ्या प्रमाणात गैरव्यवस्थापनाचा आरोप केला आहे. कोविड काळातील आयसीयू बेड आणि इतर रुग्णालयातील उपकरणे देखील वापराविना पडून आहेत, ज्यामुळे जबाबदारीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणात कठोर कारवाई आणि योग्य चौकशीची मागणी कार्यकर्ते करत आहेत.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *