मुंबई : लाडकी बहीण योजना ही कदापि बंद होणार नसून यात टप्प्याटप्प्याने वाढ केली जाणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. ठाणे येथील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनचं लाडकी बहीण योजना यावर बोललं जातं आहे. ही योजना फक्त निवडणुकीपुर्ती होती आणि आता बंद होणार आहे, आशा देखील चर्चा अधूनमधून होत असतात. तसेच निवडणुकीच्या प्रचारात आता 1500 ऐवजी 2100 रुपये देणार असल्याचं आश्वासन देखील महायुतीकडून देण्यात आलं होतं. या सगळ्यावर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले आहेत. ते म्हणाले, योजना कदापी बंद होणार नाहीत. तर टप्प्या- टप्प्याने यामध्ये वाढ होईल, विधानसभा निवडणुकीत महायुतीने दिलेली आश्वासने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी टप्प्याटप्याने पूर्ण करणार आहे. विरोधकांचा तुम्ही सुफडा साफ केला. सर्व मागण्या गोरगरिबांच्या आहेत.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सगळ्या लाडक्या बहिणींना शुभेच्छा देताना बहिणी मोठ्या संख्येने दिसत असून भाऊ कमी आहेत असे म्हणत लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या योजना कदापी बंद होणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत महायुतीने दिलेली आश्वासने टप्प्याटप्याने पूर्ण करणार, याचा पुनरुच्चार केला. लोक उलट सुलट चर्चा करीत असतात, त्यांच्या चर्चाना आपल्याला उत्तर देण्याची गरज नाही. तसेच शालेय पोषण आहार योजनेसाठी काम करणाऱ्या महिलांचा मानधनवाढीचा विषयाबाबत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून सकारात्मक मार्ग काढू असे शिंदे यांनी आश्वस्त केले.
Leave a Reply