मुंबईत वाहनांची संख्या बीजिंग, शांघाय आणि टोकियो या शहरांपेक्षा जास्त

मुंबई : एका अहवालांनुसार, मुंबईत वाहनांची संख्या बीजिंग, शांघाय आणि टोकियो सारख्या इतर मोठ्या शहरांपेक्षा जास्त आहे. एका अहवालानुसार, मुंबईत प्रति चौरस किलोमीटर ८,५०८ वाहने आहेत, तर बीजिंगमध्ये ३८९, शांघायमध्ये ८४९ आणि टोकियोमध्ये १,८०० वाहने आहेत.या आकडेवारीवरून असे दिसून येते की लोकसंख्येच्या बाबतीत मुंबईत वाहनांची संख्या जगातील या मोठ्या शहरांपेक्षा खूपच जास्त आहे. दुसऱ्या एका स्रोतानुसार, या चार शहरांपैकी सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर टोकियो आहे ज्याची लोकसंख्या ३७४,३५,१९१ आहे. मुंबईत प्रति चौरस किमी ८,५०८ वाहने (कार २,५१२) आहेत. वाहनांचा आकडा बीजिंगमध्ये ३८९, शांघायमध्ये ८४९ आणि टोकियोमध्ये १,८०० एवढा आहे. या आकडेवारीमुळे त्यामुळे मोठी लोकसंख्या असलेल्या जागतिक शहरांच्या तुलनेत मुंबईतील वाहनसंख्या खूपच जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राची वाहन घनताही प्रति चौरस किमी १२९३ वाहने एवढी आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडीसह वायुप्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी परिवहन विभागाने हे पार्किंग धोरण तयार केले. त्यातील माहितीनुसार, २००१ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्या आकडेवारीप्रमाणे नोंदणीकृत वाहन संख्येत ८.२% वाढ झाली आहे. २५.८२ लाख नवीन वाहनांची २०२३-२४ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात नोंदणी झाली आहे.

लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक वाहतूक कमी

वाढत्या लोकसंख्येमुळे २००५ ते २०१४ दरम्यान मुंबईत दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या ३१ टक्क्यांनी वाढली आहे. ती १.०७ कोटीवरून १.४१ कोटी झाली. त्या तुलनेत सार्वजनिक वाहतुकीद्वारे होणाऱ्या फेऱ्यांचा वाटा २१ टक्क्यांनी कमी झाला आहे. यात बस आणि उपनगरीय रेल्वे फेऱ्या अनुक्रमे ११ टक्के आणि १२ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.याउलट, वैयक्तिक वाहने १५.६ टक्के वाढली आहेत. ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील वाढत्या विकासामुळे सरासरी प्रवास लांबी ११.९ किमीवरून १८.३ किमीपर्यंत लक्षणीय वाढल्याने महामुंबईत वाहतुकीची डोकेदुखी आणखीच वाढली आहे. नव्या पार्किंग धोरणाच्या निमित्ताने समोर आलेली ही आकडेवारी गंभीर असून याबाबत राज्य सरकारला तातडीने उपाययोजना कराव्या लागणार असल्याचे मत आता तज्ज्ञांमध्ये व्यक्त होत आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *