कलाकार हा नेहमीच नवनिर्मितीचा शिलेदार आणि सकारात्मक ऊर्जा देणारा असतो. पण मग कलाकारालाच जर कधी संकटाला सामोरे जावे लागले तर…?
कलाकार निश्चितच त्या नैराश्यावर मात करून राखेतून झेप घेणाऱ्या पक्षाप्रमाणे उसळी मारून पुनश्च निखरून येतो व नवी भरारी घेतो….
असेच काही पंडित भूपाल पणशीकर यांच्यासोबत देखील झाले गेले दोन वर्ष काही ना काही आजारामुळे ते त्रस्त होते त्यात त्यांना त्यांची दृष्टी देखील गमावी लागली पण या दोन वर्षांच्या खंडानंतर ते रसिकांच्या सेवेत पुन्हा रुजू होत आहेत एका मुलाखतीत पत्रकारांनी त्यांना दुसऱ्या इंनिंग विषयी नेमक्या भावना विचारल्या तेव्हा ते म्हणाले “बचेंगे तो और भी बजायेंगे!” पंडित भूपाल यांना त्यांचे मोठे बंधू प्रसिद्ध तबलावादक पंडित शंतनू पणशीकर हे साथ करणार आहेत यानिमित्ताने दोघे भाऊ दोन दशकांनंतर एकत्र आपली तुला सादर करणार आहेत. पहिल्या सत्रात अमेरिकेत राहणारे प्रसिद्ध युवा तबलावादक विवेक पंड्या यांचा एकल तबलावादन सुद्धा होणार आहे विवेक हे ठाण्यात पहिल्यांदाच आपली कला सादर करत आहेत. त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. रिव्हर्स संस्थेच्या वतीने अहसास हा कार्यक्रम शनिवारी संध्याकाळी ६ वाजता सहयोग मंदिर दुसरा मजला येथे होणार आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक मेहुल नायक यांनी दिली.
महाराष्ट्र रिसर्च सेंटर या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे.
Leave a Reply