मुंबई : नागपूर हिंसाचारावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेनंतर विधानपरिषदेतही विरोधकांवर जोरदार टीका केली. विशीष्ट उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्यावर त्यांनी जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून माफी मागितली आणि मी परत येतो, असं म्हणल्याचा मोठा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर अनिल परब हे देखील दिल्लीला जाऊन माफी मागून आले आणि राज्यात येऊन पलटी मारली असं शिंदे म्हणाले. त्यांच्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली.
लांडगा वाघाचे कातडे पांघरून वाघ होत नाही : एकनाथ शिंदे
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी काही दिवसांवर एकनाथ शिंदे यांच्यावर केंद्राच्या नोटीसीला घाबरून भाजपसोबत पळून गेल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपाचा धागा पकडत शिंदे म्हणाले, या लोकांनी सत्तेसाठी
औरंगजेचे विचार स्वीकारले. पण आम्ही तुमचा टांगा पलटून टाकला. हे करायला वाघाचे काळीज लागते. लांडगा वाघाचे कातडे पांघरून वाघ होत नाही. तो लांडगाच राहतो. त्यासाठी वाघाचे काळीज लागते, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले, ये शेर का बच्चा है.
एकनाथ शिंदे म्हणाले, ये शेर का बच्चा है. आम्ही 80 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकल्या आम्ही लढून जिंकू किंवा लढून शहीद होऊ या निर्धाराने निवडणूक लढली. अनिल परब तुमच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. कोण नोटिसीला घाबरून कुठे गेले हे मला माहिती आहे.
मी कमरेखाली वार करत नाहीं. तुम्हाला नोटिस आल्यानंतर तुम्ही कुठे गेला होता हे ही मला माहिती आहे. मला जोपर्यत कुणी डिवचत नाहीं, तोपर्यत मी कुणाची कळ काढत नाहीं. सचिन अहिर तुम्हाला बरेच काही माहिती आहे. मी
खुर्चीसाठी काहीच केले नाही. मी स्वतः अमित शहा आणि नरेंद मोदींना फोन करून सांगितले तुम्ही सांगाल तो निर्णय मला मान्य असेल.
उद्धव ठाकरेंनी मोदींकडे जाऊन माफी मागितली : एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार असताना या लोकांनी देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचा कट रचला होता. यांनी औरंग्याचे विचार घेतले, मात्र मी बाळासाहेबांना सोडले नाहीं. त्यामुळे माझ्यासोबत 60 लोक आले. मी हिंदुत्ववाचे सरकार आणले,
तुम्हाला फक्त 20 लोक निवडून आणता आले यावरून जनतेचा कौलही आमच्याच बाजूने असल्याचे स्पष्ट होते, असं ते म्हणाले.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘एक अंदर की बात सांगतो यांचे प्रमुख मोदींना भेटायला गेले आणि मला वाचवा म्हणून माफी मागू लागले. अनिल परब तुम्ही देखील दिल्लीला गेला होतात आणि तिथे जावून माफी मागितली. त्यानंतर राज्यात माघारी येऊन पलटी मारली. नागपूरची घटना दुर्दैवी आहे. अमेरिकेने ओसामा बिन लादेनचे थडगे होऊ नये म्हणून त्याला समुद्रात टाकले त्यामुळे औरंग्याबाबत तुम्हाला काय प्रेम आहे? काँग्रेस काळात हे थडगे झाले आहे. त्यामुळे संभाजीनगर येथील” औरंगजेबाची कबर हवीच कशाला? असा सवालच एकनाथ
शिंदेंनी यावेळी विरोधकांना उद्देशून केली.
Leave a Reply