मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं मुखपत्र सामना या वृत्तपत्रातून मुगल बादशाह औरंगजेब याची कबर पाडण्याबद्दलची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. औरंगजेबाचे थडगे म्हणजे महाराष्ट्र शौर्याचे प्रतीक आहे, महाराष्ट्राच्या जिद्दीचे आणि मोगलांच्या पराभवाचे हे थडगे आहे, असा शब्दात सामनामध्ये मांडणी करण्यात आली आहे. सध्या देशभरात औरंगजेबच्या कबरीवरून जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. विश्व हिंदू परिषद, भाजप आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी कबर हटवण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाची याबाबतची भूमिका समोर आली आहे.
काय लिहलय सामनात?
सामनाच्या अग्रलेखात कबरीबाबत आपलं म्हणणं मांडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आवाहन करण्यात आले आहे. काही नवंहिंदुत्ववाद्यांची अशी गर्जना आहे की, ज्याप्रमाणे बाबरी पाडली त्याप्रमाणे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू. हे लोक इतिहासाचे व महाराष्ट्रच्या शौर्य परंपरेचे शत्रू आहेत. त्यांना महाराष्ट्राचे वातावरण विषारी करायचे आहे व
स्वतःला हिंदू-तालिबानी म्हणून मिरवायचे आहे. हिंदुत्वाचे विकृतीकरण घडवून शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचाही ते अपमान करीत आहेत. शिवाजी महाराज कोणाविरुद्ध लढले? मराठ्यांनी 25 वर्षे दुश्मनांना कसे झुंजवले? महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाव घालणाऱ्यांचे थडगे याच मातीत कसे बांधले जाते? हा इतिहास काही लोकांना पुसून टाकायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चाललेले हे दळभद्री उद्योग मुख्यमंत्री फडणवीस यांनी बंद पाडायला हवेत! असे आवाहन उद्धव ठाकरे गटाने दैनिक सामनाच्या माध्यमातून केले आहे.
पुढे अग्रलेखात लिहलय की, औरंगजेब थकला, हतबल झाला व पराभूत मनाने त्याने प्राण सोडले. औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकता आला नाहीं. अफझलखानास शिवरायांचा घात करता आला नाही, तुटलेली बोटे लाल महालात टाकून शाहिस्तेखान पळून गेला. औरंगजेब आणि अफझलखानाची थडगी महाराष्ट्रतच आहेत. शौर्याची स्मारके म्हणून त्याकडे पाहायला हवे.
शिवाजी महाराज कोणाविरुद्ध लढले? मराठ्यांनी 25 वर्षे दुश्मनांना कसे झुंजवले? महाराष्ट्राच्या स्वांभिमानावर घाव घालणाऱ्यांचे थडगे याच
मातीत कसे बांधले जाते? हा इतिहास आहे, आणि तो काहींना पुसायचं आहे, असं सामनात दावा करण्यात आलाय.
छत्रपती महाराष्ट्रात जन्मास आले हे महाराष्ट्रचे भाग्य
छत्रपती महाराष्ट्रात जन्मास आले हे महाराष्ट्रचे भाग्य. महाराजांनी तलवारीच्या जोरावर ‘स्वराज्य’ निर्माण केले व जे त्यांच्या तलवारीस भिडले ते याच मातीत गाडले गेले. त्यातला एक बादशहा औरंगजेब. औरंगजेबाची कबर म्हणजे महाराष्ट्रच्या अस्मितेचे, झुंजार पराक्रमाचे स्मारक आहे ही ‘कबर’ हटवा नाहीतर आम्ही ती उद्ध्वस्त करू
अशी भूमिका भाजप किंवा संघ पुरस्कृत काही माथेफिरू धर्मवेड्यांनी घेतली. त्यांनी इतिहास समजून घेतला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रची चळवळ अगदी भरात होती तेव्हाची गोष्ट. पु म. लाड तेव्हा केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्रालयाचे सचिव होते. महाराष्ट्रासंबंधी उलट-सुलट विचार प्रकट करणारे राज्यकर्त्यांचे अनेक ‘अंधभक्त
त्यांच्याकडे येत. त्या वेळी लाड त्यांना एक ठरावीक उत्तर देत असत. “महाराष्ट्रबद्दलचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी औरंगाबादला (छत्रपती संभाजीनगर) जाऊन औरंगजेबाचे
थडगे पाहून या,” असे ते या मंडळींना सांगत, असं लिहलय.
Leave a Reply