उद्धव ठाकरे शिंदेंच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवणार, ठाकरेंची रणनिती काय?

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये निवडणूक लढण्याची उद्धव ठाकरे यांची रणनिती असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. ठाणे पालिका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच तयारीला लागावं, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत. “ठाणे पालिका आपलीच राहणार,” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी निवडणुकीसाठी रणनिती ठरवण्यावर भर दिला.
मुंबईनंतर ठाणे पालिकेवर लक्ष केंद्रीत करत उद्धव ठाकरेंनी ठाण्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीला राजन विचारे यांच्यासह ठाण्यातील वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान ठाकरेंनी ठाणे पालिका निवडणुकीसाठी निरीक्षक नेमण्याच्या सूचनाही दिल्या.
शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात लढण्याच्या या रणनितीमुळे राजकीय वातावरण तापणार असल्याचं निश्चित आहे. ठाणे पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचं आदेश दिलं असून, आगामी निवडणुकीसाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *