वाढवण बंदराच्या शेजारीच नव्या शहराची उभारणी! वाढवण बंदराच्या जवळ चौथी मुंबई वसवली जाणार असून, यासाठी १०७ गावांतील ५१२ चौ. किमी क्षेत्र नियोजन प्राधिकरण म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर होताच एमएसआरडीसीला नवे शहर उभारण्याचा मार्ग मोकळा होईल.
ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने एक पाऊल!
नीती आयोगाने मुंबई महानगर क्षेत्राला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी आर्थिक विकास केंद्र (ग्रोथ हब) उभारली जात आहेत. वाढवण येथे देशातील सर्वात मोठ्या बंदराची उभारणी सुरू असल्याने हे ठिकाण चौथ्या मुंबईसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
वाढवण आणि केळवा येथे विकास केंद्रांची उभारणी
डहाणू तालुक्यातील वाढवण आणि पालघर तालुक्यातील केळवा येथे दोन स्वतंत्र विकास केंद्रे उभारण्याची जबाबदारी यापूर्वीच एमएसआरडीसीला देण्यात आली होती.
१)वाढवण विकास केंद्र – ३३.८८ चौ. किमी क्षेत्रफळ
२)केळवा विकास केंद्र – ४८.२२ चौ. किमी क्षेत्रफळ
डहाणूतील ११ आणि पालघरमधील ३ गावांमध्ये ही केंद्रे साकारली जाणार होती. मात्र, चौथ्या मुंबईच्या संकल्पनेनुसार हे क्षेत्र तलासरीपर्यंत विस्तारले जाणार आहे.
चौथ्या मुंबईची हद्द कुठपर्यंत?
१०७ गावांचा समावेश असलेल्या ५१२ चौ. किमीच्या क्षेत्रात चौथी मुंबई विकसित केली जाणार आहे. हा प्रस्ताव एमएसआरडीसीने जानेवारीतच राज्य सरकारकडे पाठवला आहे. या नव्या शहराची हद्द वाढवण बंदराच्या प्रभाव क्षेत्रातून तलासरीपर्यंत जाणार आहे.
वर्षभरात होणार विकास आराखडा तयार!
राज्य सरकारकडून एमएसआरडीसीला नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता मिळताच एका वर्षाच्या आत संपूर्ण विकास आराखडा तयार केला जाईल.
चौथ्या मुंबईत काय असेल?
१. लॉजिस्टिक पार्क – वाढवण बंदरामार्गे आलेल्या मालाच्या साठवणुकीसाठी मोठे लॉजिस्टिक हब तयार होणार.
२. पंचतारांकित हॉटेल्स – उद्योगपती, व्यापारी आणि आंतरराष्ट्रीय पाहुण्यांसाठी आलिशान हॉटेल्सची उभारणी.
३. मनोरंजन क्षेत्र – गोल्फ कोर्ससह मोठे रिक्रिएशन ग्राउंड आणि कन्व्हेन्शन सेंटर्स.
४. रेल्वे फ्रेट कॉरिडॉर – वाढवण बंदर ते दिल्ली-मुंबई डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमधून जलद आणि पर्यावरणपूरक मालवाहतूक.
५. हेलिपॅड आणि एअर स्ट्रिप – वेगवान आणि प्रभावी वाहतुकीसाठी हवाई सेवा उपलब्ध केली जाणार.
Please follow and like us:
Leave a Reply