वसई-विरार शहर महानगरपालिका (ग्रंथालय विभाग) आणि यंग मेन्स कॅथॉलिक असोसिएशन, माणिकपूर यांच्या सहकार्याने आयोजित ‘अभिजात मराठीचा उद्घोष साहित्य जल्लोष’ शनिवार १८ जानेवारी रोजी सुरू झाला. उद्घाटन झाल्यानंतर ‘अभिजात मराठी भाषा आणि आपली जबाबदारी’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता . त्यात “महाराष्ट्र रिसर्च सेंटर”चे संपादक महेश म्हात्रे यांनी मराठी भाषा, पत्रकारिता आणि सर्वसामान्य माणसाची भूमिका यावर मांडलेले मत… तुम्ही ऐका आणि दुसऱ्यांनाही ऐकवा…
मराठी एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष प्रदीप सामंत, मराठी चित्रपट विकास मंडळाचे संचालक संजय कृष्णाजी पाटील, माजी प्राचार्य फा. संबी कोरीया आणि ललित लेखिका राणी दुर्वे यांचाही या परिसंवादात सहभाग होता. प्रसिध्द निवेदिका स्वाती जोशी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे, माजी साहित्य संमेलन अध्यक्ष रविंद्र शोभणे, उद्योजक आजीव पाटील, कवी नंदू सावंत आदी मान्यवर उपस्थित होते…
Leave a Reply