भारताने मंगळवारी मध्य रात्री पाकिस्तान वर हवाई हल्ला करत 24 क्षेपणास्त्र नऊ भागात दागले. भारताने या मोहिमेला ऑपरेशन सिंधूर असे नाव दिले होते. या ऑपरेशनला सिंदूर हे नाव का देण्यात आले याबाबत जगभरात चर्चा सुरू आहे. हे नाव देण्यामागचे नेमकं कारण काय हे आपण जाणून घेऊ. 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटक मृत्युमुखी पडले होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी पुरुषांना टार्गेट केले होते. ज्यामध्ये लेफ्टनंट विन नरवाल यांचाही मृत्यू झाला होता.मृत्यू झालेल्या लेफ्टनेंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांनी अत्यंत हतबल अवस्थेत मृतदेहाजवळ बसून आक्रोश केला होता. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर देशभरात मोठा संताप व्यक्त केला गेला. भारताने याच पार्श्वभूमीवर हल्ल्याला ऑपरेशन ‘सिंदूर’ असं नाव दिलं.
इतकेच नाही तर या हल्ल्यात अनेक महिलांचे कुंकू पुसले गेले होते. म्हणून देखील भारत सरकारने या ऑपरेशनला सिंदूर असे नाव दिले होते असे सांगण्यात येते.या नावामागे पहलगामच्या बदल्याचा संदेश आहे असं दिसतंय.त्यामुळेच भारताने अत्यंत जाणीवपूर्वक ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं. तिन्ही संरक्षण दलांच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नाव सुचवलं अशी माहिती आहे. या हल्ल्यानंतर पीडित कुटुंबीयांच्या महिलांनी समाधान व्यक्त करत भारतीय सैन्याचे आभार मानले आहेत.
पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतात मोठ्या प्रमाणात रोष दिसून आला. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे त्यांना घरात घुसून मारावे आणि दहशतवाद्यांचा नायनाट करावा अशी भारतीयांची भावना होती.
अखेर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर मधून दहशतवाद्यांना करारा जवाब दिला आहे. ऑपरेशन सिंदूर मध्ये अनेक दहशतवादी अड्डे उडवले असल्याचे माहिती आता समोर आली आहे या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सैन्य यशस्वी झाले आहे.
Leave a Reply