२६ जानेवारी २०२५ हा ७५ वा प्रजासत्ताक दिन, 75th Republic Day आहे, या दिनी मोठा उत्सव साजरा करण्यासाठी, चैत्यभूमी दादर येथे लोकसत्ताक महोत्सव २६ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वा. आयोजीत करण्यात आला आहे.
सदर सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन भारतीय लोकसत्ताक संघटना, भारतीय बौद्ध महासभा, राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिति यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास मा. डॉ. भिमराव आंबेडकर सर आणि मा. डॉ. हर्षदीप कांबळे सर (प्रधान सचिव : सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य.) उपस्थित राहणार आहेत.
मुंबई मध्ये सातत्याने गेली १३ वर्ष भारतीय लोकसत्ताक संघटनेच्या वतीने संविधान रॅलीचे आयोजन करण्यात येते . या संविधान रॅलीचा समारोप चैत्य भूमी येथे सायंकाळी ५.०० वाजता होणार आहे.
आपल्या संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरू झाली तो दिवस प्रत्येक भारतीयांसाठी खरा मुक्ती दिन आहे . या दिनाचा खऱ्या अर्थाने मोठा उत्सव सर्व भारतीयांनीच साजरा करायला हवा पण तसे होतांना दिसत नाही. हा ७५ वा अमृत महोत्सव भव्य दिव्य करण्यासाठी सदर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपण सर्व देश बांधवांनी सदर कार्यक्रमात सुंदर पोशाख घालून सहभागी व्हावे तसेच आपल्या मित्र परिवाराला व सर्व धर्मियांतील आपल्या मित्रांनाही यात सहभागी असे आवाहन समन्वयक डॅा विजय कदम यांनी केले आहे.

दादर मध्ये साजरा होणार अनोखा “लोकसत्ताक महोत्सव”
•
Please follow and like us:
Leave a Reply