हार्वर्ड बिझनेस स्कूलमधील (HBS) २०२४ च्या बॅचमधील २३% एमबीए पदवीधरांना पदवी मिळाल्यानंतर तीन महिने उलटले तरी नोकरी मिळालेली नाही, असे अलीकडील अहवालातून समोर आले आहे. स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल आणि व्हार्टन स्कूल यांसारख्या प्रतिष्ठित आयव्ही लीग संस्थांमध्येही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. कौशल्याचा अभाव आणि टेक-सेक्टरमधील मंदीचे दुष्परिणाम हार्वर्डच्या पदवीधरांसाठी रोजगाराच्या आकडेवारीत सातत्याने घट होत आहे. २०२२ मध्ये ही संख्या १०% होती, तर २०२३ मध्ये ती २०% झाली आणि आता २०२४ मध्ये ती २३% वर पोहोचली आहे.
आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या (ILO) अहवालानुसार, २०२३ मध्ये जागतिक स्तरावर १३% तरुण कामगार बेरोजगार होते, जे सुमारे ६४.९ दशलक्ष लोकसंख्येच्या बरोबरीचे आहे. याशिवाय, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या २०२० च्या अहवालानुसार, केवळ २५% व्यवस्थापन व्यावसायिकांना नोकरीसाठी पात्र मानले जात होते, आणि या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही.
स्टॅनफोर्ड आणि व्हार्टनमध्येही बेरोजगारीची समस्या.
हार्वर्डसह स्टॅनफोर्ड (२२%), व्हार्टन (२०%), आणि न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेस यांसारख्या संस्थांमध्येही प्लेसमेंटच्या आकडेवारीत घट झाली आहे. शिकागो विद्यापीठाच्या बूथ स्कूल आणि नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या केलॉग स्कूलमधील बेरोजगार पदवीधरांची संख्या तिपटीने वाढली आहे.
कंपन्यांचे बदलते भरती धोरण
हार्वर्ड आणि इतर संस्थांमधील पदवीधरांचा सरासरी प्रारंभिक पगार $१७५,००० पेक्षा जास्त असतो. तरीही, टेक्नॉलॉजी आणि कन्सल्टिंग क्षेत्रांतील भरती मंदावल्यामुळे नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत.
२०२३ मध्ये मोठ्या प्रमाणावर टेक कंपन्यांनी नोकरकपात केली. गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन आणि कन्सल्टिंग क्षेत्रातील मॅकिन्से व बीसीजी यांसारख्या कंपन्यांनी एमबीए पदवीधारकांसाठी उपलब्ध नोकऱ्यांमध्ये मोठी कपात केली आहे.
याशिवाय, कंपन्या लहान, कार्यक्षम संघ तयार करण्यावर भर देत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ऑटोमेशनच्या उदयामुळेही भरतीमध्ये मोठा बदल झाला आहे.
डब्ल्यूएसजेच्या (WSJ) अहवालानुसार, अनेक कंपन्या कॅम्पस रिक्रूटमेंटला प्राधान्य देत नाहीत. त्याऐवजी, त्या तांत्रिक कौशल्य आणि कार्यक्षमतेला अधिक महत्त्व देत आहेत. एलोन मस्कच्या म्हणण्यानुसार, “कौशल्य महत्त्वाचे आहे, पदवी नाही.”
पारंपरिक एमबीए अभ्यासक्रमांची मर्यादा
सध्याच्या नोकरी बाजारपेठेत केवळ व्यवसायाचे सामान्य ज्ञान असणे पुरेसे नाही. कंपन्यांना विशिष्ट तांत्रिक कौशल्यांवर चांगली पकड असलेले उमेदवार हवे आहेत. परिणामी, पारंपरिक एमबीए अभ्यासक्रमांना नोकरी बाजाराच्या बदलत्या गरजांशी जुळवून घ्यावे लागेल. बूटकॅम्प आणि कौशल्य-आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना कंपन्या आता प्राधान्य देत आहेत.
कौशल्य सुधारणा गरजेची
हार्वर्डने एमबीए पदवीधारकांसाठी एक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित टूल विकसित केले आहे, जे विद्यार्थ्यांच्या कौशल्यांतील कमतरता ओळखते आणि त्या सुधारण्यासाठी योग्य अभ्यासक्रमांची शिफारस करते.
एमबीए शिक्षणासाठी ही परिस्थिती चिंताजनक आहे. कौशल्यच आता खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे नोकरीच्या बाजारपेठेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमितपणे स्वतःचे कौशल्य सुधारणे आणि अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे
Leave a Reply