आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; मुंडे आणि कोकाटे विरोधकांच्या निशाण्यावर

मुंबई : महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. यावेळी विविध विषयांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण, महिलांवरील वाढते अत्याचार, एसटी डेपो आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेचा अभाव, मंत्र्यांवरील आरोप, शेतकऱ्यांचे प्रश्न, आणि योजनांची अपुऱ्या अंमलबजावणी यासारख्या मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांचा राहील.

राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात होईल

सत्ताधाऱ्यांच्या तुलनेत विरोधी आमदारांची संख्या ही नगण्य आहे. मात्र वेगवेगळ्या विषयांवर सरकारला धारेवर धरण्याचा विरोधकांचा प्रयत्न राहील.आजच्या दिवसाचा कामकाजाला
राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात होईल. शोक प्रस्तावानंतर आजच्या दिवसाचा कामकाज संपेल. त्याचबरोबर येत्या काही दिवसात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आदित्य ठाकरे यांच्या नावाचं अर्ज विरोधी पक्षनेता म्हणून दाखल दाखल केला जाऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकुमार बडोले यांची विधानसभा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाणार असल्याचं कळतंय. तर 10 मार्च रोजी अर्थमंत्री अजित पवार राज्याचं अर्थसंकल्प मांडतील.

‘महाराष्ट्रात 2 गुंडे कोकाटे आणि मुंडे’, विरोधी आमदारांची घोषणाबाजी

विरोधी आमदारांनी पहिल्याच दिवशी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केली. ‘महाराष्ट्रात 2 गुंडे कोकाटे आणि मुंडे’ अशी घोषणाबाजी विरोधी आमदारांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर केली. तर जितेंद्र आव्हाड हे हातात बेड्या घालून सभागृहात आले. “अमेरिकाविरोधात आवाज उठवा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणला जातोय, म्हणून प्रतिनिधिक स्वरूपात बेड्या घालून आलोय, असं आव्हाड म्हणाले.” आव्हाडांची ही नौटंकी असून बेड्या घालायची ते आत्तापासूनचं प्रॅक्टिस करत आहेत, असं आमदार गुलाबराव पाटील म्हणाले.

या मुद्द्यांवर विरोधक अधिवेशनात उठवू शकतात आवाज

  1. ●मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण
  2. ●महिला सुरक्षा आणि एसटी बसेसची सुरक्षाव्यवस्था
  3. ●पुण्यातल्या स्वारगेट एसटी डेपोतील बलात्कार प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
  4. ● शेतकऱ्यांना हमीभाव तसेच कर्जमाफी
  5. ●मंत्र्यांवरील आरोप आणि राजीनाम्याची मागणी
  6. ●कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा
  7. ●अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बीड जिल्ह्यातील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीशी संबंध असल्याने राजीनाम्याची मागणी होऊ शकते
  8. ●कापूस आणि सोयाबीन खरेदीत सरकार अपयशी ठरलंय, हमीभाव मिळत नाही, शेतकऱ्यांच्या अडचणी
  9. ● ‘लाडकी बहीण’ योजनेतील अडचणी
Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *