नवीन आधार ॲप लाँच, आता कुठेही आधारची फोटो कॉपी द्यावी लागणार नाही; फक्त स्मार्टफोनच्या मदतीने होणार ‘हे’ महत्त्वाचे काम

मोदी सरकारने नागरिकांसाठी एक मोठं डिजिटल पाऊल उचललं आहे ‘नवीन आधार अॅप’ लाँच करण्यात आलं असून, यामुळे आता फिजिकल आधार कार्ड किंवा त्याच्या झेरॉक्सची गरजच भासणार नाही. माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून या नव्या अॅपचा व्हिडीओ शेअर करत याची माहिती दिली. हे अॅप सध्या बीटा टेस्टिंग टप्प्यात असून, यामध्ये फेस आयडी ऑथेंटिकेशन, डेटा सिक्युरिटी, आणि प्रायव्हसीला प्राधान्य देण्यात आलं आहे.

नव्या आधार अँपची वैशिष्ट्यं काय?

1. युजर्स आता स्वतःच आवश्यक ती माहिती शेअर करू शकतात, जेणेकरून त्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहील.

2. यूपीआय पेमेंटमध्ये जसा क्यूआर कोड स्कॅन केला जातो, त्याचप्रमाणे आधार व्हेरिफिकेशनही आता तितकंच सोपं होणार आहे.

3. फोटोकॉपी, स्कॅनिंगचं झंझट नाही;सर्व प्रक्रिया अॅपवरूनच

4. चेहरा ओळखून लॉगिन आणि व्हेरिफिकेशनची सोय ;अधिक सुरक्षित.

5. हॉटेल, दुकान, ट्रॅव्हल चेकपोस्टवर आधार प्रत देण्याची गरज नाही;अॅपच पुरेसं.

6. १००% डिजिटल प्रक्रिया;संपूर्ण ओळख डिजिटल आणि सुरक्षित.

7. या अॅपमुळे आधार कार्डशी संबंधित डेटाचा गैरवापर किंवा लीक होण्याचा धोकाही कमी होईल.

8. फसवणूक किंवा माहितीशी छेडछाड टाळता येणार; अधिक नियंत्रण.

9. अत्यंत कमी वेळात व्हेरिफिकेशन पूर्ण ;जलद आणि सोपं!

10. युजर्सची प्रायव्हसी जुन्या पद्धतींपेक्षा अधिक मजबूत असेल

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *