मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू आणि ८० पेक्षा अधिक जण जखमी झाल्याच्या भयंकर प्रकरणात मुंबई पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अर्शद खानला लखनऊमधून अटक करण्यात आली आहे. गेल्या सात महिन्यांपासून फरार असलेला खान याला या घटनेबद्दल चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.१३ मे रोजी मुसळधार पावसात आणि प्रचंड वाऱ्याच्या झोतात घाटकोपरमधील एक पेट्रोल पंपावर बेकायदेशीरपणे लावलेले होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेत १७ निरपराध लोकांचे प्राण गेले होते आणि ८० हून अधिक जण जखमी झाले होते. या होर्डिंग लावणाऱ्या “इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड”ने अर्शद खानशी संबंधित विविध बँक खात्यांमध्ये ८२ लाख रुपयांची रक्कम हस्तांतरित केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
अर्शद खान हा माजी सरकारी रेल्वे पोलिस आयुक्त कैसर खालिद यांचा व्यावसायिक साथीदार असल्याचे समोर आले आहे. खालिद यांच्या कार्यकाळात रेल्वेच्या जमिनीवर होर्डिंग लावण्याची परवानगी देण्यात आली होती. या घटनेनंतर खालिद यांना होर्डींग मंजुरी प्रक्रियेतील गडबडींबद्दल निलंबित करण्यात आले होते. खानने तपासाच्या सुरुवातीला आपले जबाब दिले होते, परंतु या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकासमोर तो हजर राहिला नाही. खानचा शोध सुरू असतानाही तो सतत ठिकाणे बदलत राहिला. अखेर रविवारी त्याला लखनऊमध्ये पोलिसांच्या हाती लागला.
इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून अर्शद खानशी संबंधित विविध आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जात आहे. विशेषतः त्याला सहकार्य देणाऱ्या पोलीस अधिकारी खालिद यांच्या कार्यकाळात झालेले व्यवहारांचा बारकाईने तपास करण्यात येत आहे.
Leave a Reply