बहुप्रतिक्षित कोल्डप्ले बँडचा पहिला कॉन्सर्ट भारतात नवी मुंबई येथे होणार आहे. या कॉन्सर्टसाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. काल बँडचा मुख्य गायक ख्रिस मार्टिन मुंबई विमानतळावर दाखल झाला. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. विमानतळावर आगमन झाल्यानंतर ख्रिस मार्टिनने मुंबईतील मरीन ड्राइव्हला भेट दिली. त्याने त्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत “आम्ही भारतात येऊन खूप आनंदी आहोत” असे लिहिले आहे. कोल्डप्ले बँडचे भारतातील हे कॉन्सर्ट या वर्षातील प्रमुख आकर्षण मानले जात आहे.
कोल्डप्ले हा एक ब्रिटिश बँड असून, ‘म्युझिक ऑफ द स्फीयर्स वर्ल्ड टूर’ अंतर्गत नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये १८, १९ आणि २१ जानेवारी २०२४ रोजी तीन शो होणार आहेत. याशिवाय गुजरातमधील अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर २५ जानेवारी रोजी चौथा शो आयोजित करण्यात आला आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा
अहमदाबादच्या जिल्हा बाल संरक्षण विभागाने या कॉन्सर्टसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. स्टेजवर लहान मुलांना आणू नये, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास आयोजकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच कॉन्सर्टमधील आवाजाची मर्यादा १२० डेसिबलपेक्षा जास्त नसावी, कारण तो आवाज लहान मुलांच्या आरोग्यास हानीकारक ठरू शकतो. मुलांना इअरप्लग किंवा इअर प्रोटेक्शनशिवाय प्रवेश देऊ नये, अशीही सूचना करण्यात आली आहे

भारतामध्ये कोल्डप्ले बँडच्या कॉन्सर्टचे आयोजन; मुख्य गायक ख्रिस मार्टिनचे मुंबईत आगमन
•
Please follow and like us:
Leave a Reply