अमित शहा उद्या सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनालणा जाणार; रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे गटात नाराजी

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रायगड दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी (ता. रोहा) येथील निवासस्थानी स्नेहभोजनासाठी जाणार आहेत. या भेटीमुळे शिवसेना (शिंदे गट) आणि रायगडचे आमदार भरत गोगावले यांच्यात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा ठरला आहे. काही दिवसांपूर्वी आदिती तटकरे यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, शिंदे यांनी या निर्णयाला दिल्ली गाठून आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर अवघ्या २४ तासांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तटकरे यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली होती. या घडामोडीनंतर दोन्ही पक्षांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

अमित शहा हे सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनासाठी जाणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर, आमदार भरत गोगावले यांच्या नाराजीचे संकेत मिळत आहेत. तटकरे आपल्या राजकीय वजनाचा उपयोग करून आपल्या कन्या आदिती तटकरे यांच्याकडेच पालकमंत्रीपद कायम ठेवतील, अशी शक्यता गोगावले व्यक्त करत आहेत. या भेटीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांची उपस्थिती निश्चित आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार गोगावले उपस्थित राहणार की नाही, यावर राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी रात्री आठ वाजता त्यांचे पुण्यात आगमन होणार असून, तेथे ते मुक्कामी थांबतील. शनिवारी सकाळी ते रायगड किल्ल्यावर भेट देतील आणि पायथ्याशी असलेल्या पाचड येथे राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेतील. यानंतर रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन सायंकाळी विलेपार्ले येथील एका प्रसिद्धीमाध्यमाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. रात्री सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह विविध नेत्यांशी ते महत्त्वपूर्ण राजकीय चर्चा करणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.

सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या स्नेहभोजनामुळे नव्या राजकीय समीकरणांची शक्यता वर्तवली जात आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेला संघर्ष आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्याची तटकरे कुटुंबाशी जवळीक या पार्श्वभूमीवर शिंदे गटासाठी हा राजकीय इशारा ठरू शकतो. या भेटीनंतर रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरण कशा प्रकारे बदलते, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *