Author: Mustan Mirza
-

माणिकराव कोकाटे अडचणीत; राजीनाम्याची शक्यता, धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाची चर्चा
•
सदनिका घोटाळा प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. मंगळवारी न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या निकालानंतर याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकाटे यांना…
-

स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा; काँग्रेसमध्ये खळबळ
•
काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार प्रज्ञा सातव यांचा उद्या 18 डिसेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि नाराजीमुळे त्यांनी हा…
-

विम्याच्या पैशांसाठी दुसऱ्याचा जीव; आत्महत्येचा थरारक बनाव उघड
•
लातूर जिल्ह्यात एक कोटी रुपयांच्या टर्म इन्शुरन्सच्या रकमेसाठी दुसऱ्या व्यक्तीचा निर्घृण खून करून स्वतः मृत असल्याचा बनाव करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. औसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेचा छडा लावण्यात लातूर पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले असून आरोपी गणेश गोपीनाथ चव्हाण याला अटक करण्यात आली आहे. दि.…
-

भंडाऱ्यात ‘पुष्पा’सारखी सागवान तस्करी उघड; मध्यप्रदेश–महाराष्ट्र सीमेवर मोठं सिंडिकेट सक्रिय
•
भंडारा : लाल चंदन तस्करीवर आधारित ‘पुष्पा’ चित्रपटातील कथेसारखाच धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. मध्यप्रदेशातून अवैधपणे सागवान वृक्षतोड करून महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यामार्गे नागपूर आणि मुंबईपर्यंत लाकडांची वाहतूक करणाऱ्या मोठ्या तस्करीच्या सिंडिकेटचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणामुळे वन विभागात मोठी खळबळ उडाली असून, विभागाच्या कारवाईवरही संशय व्यक्त केला जात…
-

माणिकराव कोकाटेंना कोर्टाचा मोठा धक्का; दोन वर्षांची शिक्षा कायम, आमदारकी व मंत्रिपद धोक्यात?
•
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या असून, ३० वर्षांपूर्वीच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. या निर्णयामुळे कोकाटे यांच्या आमदारकीसह मंत्रिपदावरही टांगती तलवार निर्माण झाली असून, राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शासकीय १० टक्के कोट्यातील सदनिका…
-

गोवा नाईटक्लब आगीप्रकरणी फरार लुथ्रा बंधूंना भारतात आणले
•
नवी दिल्ली : गोव्यातील अरपोरा येथील ‘बिर्च बाय रोमियो लेन’ नाईटक्लबमध्ये झालेल्या भीषण आगीप्रकरणी फरार झालेले क्लबचे मालक गौरव लुथ्रा आणि सौरभ लुथ्रा यांना मंगळवारी भारतात परत आणण्यात आले. थायलंडमध्ये अटकेनंतर इंडिगोच्या विमानाने दोघांना दिल्लीला आणण्यात आले असून, त्यांना आता स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. गोवा पोलिसांकडून त्यांच्या ट्रान्झिट…
-

मनातले ओठांवर आले… जयंतराव तोंडघशी पडले !
•
गावगाड्यातील बारा बलुतेदार म्हणजे आपले गुलाम, त्यांना काहीही बोलले तरी चालते. अशी मानसिकता आजही कायम आहे. हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी दाखवून दिले आहे… त्या जातीयवादी वृत्तीची बिन पाण्याने करणारा, महेश म्हात्रे यांचा परखड लेख… मनातले ओठांवर आले… जयंतराव तोंडघशी पडले ! हिवाळी अधिवेशनात विधानसभेत पोलिसांच्या…
-

मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा; १५ जानेवारीला मतदान, १६ ला निकाल
•
राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह राज्यातील एकूण २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. मुदत संपलेल्या २७ महापालिका आणि नव्याने निर्माण झालेल्या इचलकरंजी व जालना या २ महापालिकांसह एकूण २९ महापालिकांमधील २,८६९ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे…
-

माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांचा भाजपात प्रवेश
•
शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आज भाजपामध्ये अधिकृत प्रवेश केला. दादर येथील वसंत स्मृती येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या प्रवेशामुळे मुंबईच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. पक्षप्रवेशापूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर…
-

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
•
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल अखेर वाजले असून, मुंबईसह सर्व प्रलंबित महापालिकांच्या निवडणुकांची आज घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद बोलावली असून, या परिषदेत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिका, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड,…
