Author: mahacentreweb@gmail.com
-

भोंगळ व्यवस्थेचा बळी? किरकोळ कंत्राटदाराच्या खात्यात कोट्यवधींचा प्रवाह,३१४ कोटींच्या करनोटिशीने खळबळ
•
चंद्रशेखर कोहाड – एक किरकोळ कंत्राटदार. पण सध्या त्याचं नाव ३१४ कोटींच्या आयकर नोटिशीमुळे चर्चेत आहे. एकेकाळी छोट्या कामांसाठी ओळखला जाणारा हा व्यक्ती, आता आर्थिक गैरव्यवहारांच्या तपासणीच्या भोवऱ्यात सापडला आहे.कोहाडला यापूर्वी अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून समन्सही पाठवण्यात आले होते. मात्र, तो या समन्सला प्रतिसाद देऊ शकला नाही.त्यानुसार २०११-१२ ते २०१५-१६…
-

हापूस आंब्याच्या दरात मोठी घसरण; कोकणातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका
•
पुरवठा वाढल्याने बाजारात दर घसरले; ग्राहक समाधानात, मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले कोकणातील ‘सोन्यासारखा’ समजला जाणारा हापूस आंबा यंदा बाजारात मोठ्या प्रमाणावर दाखल झाला असून, त्यामुळे त्याच्या दरात लक्षणीय घसरण झाली आहे. पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये आंब्याची विक्रमी आवक होत असल्यामुळे ग्राहकांना स्वस्तात आंबे मिळत आहेत. मात्र या घसरणीचा थेट फटका कोकणातील…
-

सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाचे उद्घाटन : मेट्रो लाईन ३ च्या प्रगतीला नवे बळ
•
पूर्व-पश्चिम दिशेतील प्रवास अधिक सुकर; भाविक व प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेले भूमिगत स्थानक कार्यान्वित मुंबईच्या पूर्व ते पश्चिम दिशेतील सुलभ वाहतुकीच्या दीर्घकाळच्या स्वप्नाला यशाची नवी दिशा मिळाली आहे. अॅक्वा लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन ३ वरील सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. हे भूमिगत स्थानक प्रभादेवीतील पूजनीय श्री…
-

रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात वाघाच्या हल्ल्यात ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
•
राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात बुधवारी वाघाने ७ वर्षांच्या मुलाचा जीव घेतला. त्रिनेत्र गणेश मंदिरातून कुटुंबासोबत परतत असताना, जंगलाच्या आत वाघाने त्याच्यावर हल्ला केला. काही वेळाने त्याचा मृतदेह जंगलात खोल आत सापडला. या घटनेनंतर मंदिरातून परतणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक भाविकांनी गणेशधाम पोलिस ठाण्यात धाव घेतली…
-

महाराष्ट्रात जेएसडब्ल्यू स्टीलचा ‘ग्रीन स्टील प्लांट’; साळव येथे ६०,००० कोटींची टप्प्याटप्प्याने गुंतवणूक
•
देशातील आघाडीच्या औद्योगिक समूहांपैकी एक असलेल्या जेएसडब्ल्यू स्टीलने महाराष्ट्रात साळव (जिल्हा – रत्नागिरी) येथे हरित पोलाद प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे.
-

काँग्रेसच्या सद्भावना शांती मार्चला नागपूर येथून सुरुवात; नाना पटोले गैरहजर, सर्वांच्याच भुवया उंचावल्या
•
महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने नागपूर येथून सद्भावना शांती मार्च आयोजित करण्यात आली आहे.
-

पुण्यातील व्यक्तीने फाडली पासपोर्टची पाने; कुटुंबापासून बँकॉक प्रवास लपवण्याचा प्रयत्न
•
सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका ५१ वर्षीय पुणेकर प्रवाशाने इमिग्रेशन अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली.
-

इंदिरा मार्केट परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा; नागरिक त्रस्त, महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
•
शीव पश्चिमेतील इंदिरा मार्केट परिसर, विशेषतः रोड क्रमांक २१, सध्या अनधिकृत स्टॉल्स आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे हैराण झाला आहे.
-

मुव्हिंग गाडीतून बाहेर लटकणारा हात; रीलसाठी ‘डेड बॉडी ड्रामा’, चौघे ताब्यात
•
नवी मुंबईत चार तरुणांनी सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अजब स्टंट केला. एमयूव्हीच्या डिकीतून मानवी हात बाहेर लटकत असल्याचा देखावा करत त्यांनी एक व्हिडीओ रील तयार केला
-

दादरमधील व्यापाऱ्यांची प्रशासनाला आर्जवी : “रस्त्यांवरील फेरीवाल्यांवर तरी कारवाई करा!”
•
दादर पश्चिम परिसरात वाढत चाललेल्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे
