Category: News and Updates
-

कोब्रा कंमाडोंकडून म्होरक्या विवेकसह 8 नक्षलवाद्यांचा खात्मा; 1कोटींचं होतं बक्षीस
•
झारखंडच्या बोकोरा जिल्ह्यातील 8 नक्षलींचा खात्मा करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. CRPF चे कोब्रा कमांडो आणि झारखंड पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. नक्षली चळवळीचा म्होरक्या आणि 1 कोटी रुपयांचे पारितोषिक असलेल्या भाकपा माओदी केंद्रीय कमिटीचा सदस्य मांझी उर्फ विवेक दा याचाही खात्मा करण्यात आला आहे. मांझीला ठार…
-

”सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगावरही संशय”; राहुल गांधींचा अमेरिकेत मोठा दावा
•
अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर “तडजोड” झाल्याचा आरोप केला आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदानाच्या शेवटच्या दोन तासांत मतदानात “असामान्य” वाढ झाल्याचे नमूद केले. त्यांनी बोलताना महाराष्ट्राचं उदाहरण दिलं. सध्या अमेरिका दौऱ्यावर असलेले राहुल गांधी यांनी रविवारी बोस्टन येथे झालेल्या एका कार्यक्रमात हे विधान केले. त्यांनी…
-

एटीएममधून पैसे काढणे 1 मे पासून महागणार; अशी आहे शुल्कवाढ
•
1 मे पासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता अधिकचे पैसे द्यावे लागणार आहे. इतकंच नाही तर बॅलन्स तपासल्यावर देखील शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे एटीएम वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने एक अधिसूचना जारी करून इंटरचेंज फीमध्ये वाढ जाहीर केली आहे. कसं आकारले जाणार शुल्क? १…
-

सोन्याचे दर गगनाला भिडले; 1 लाखांचा टप्पा पार
•
सोन्याचे दर गगनाला भिडले आहे. या आठवड्याच्या सुरवातीला सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. सोमवारी सोनं एक लाखांवर जाऊन पोहोचलं आहे. भारतात कमोडिटी एक्सचेंजनुसार गोल्ड फ्युचर्स सुरुवातीला 1196 रुपयांनी म्हणजे 1.26 टक्क्यांनी उसळले आहे. त्यामुळं 10 ग्रॅम सोन्याचा दर 96,450 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर जीएसटीसह सोनं शुद्ध सोने जीएसटीसह…
-

जलजीवन योजनेतील प्रचंड भ्रष्टाचारामुळे हजारो कोटी खर्चूनही महाराष्ट्र तहानलेलाचः हर्षवर्धन सपकाळ
•
मुंबई : हजारो कोटी रुपये खर्चूनही महाराष्ट्र राज्यात पाण्याची समस्या कायम आहे. अनेक ठिकाणी पाणी टंचाई जाणवत आहे, ज्यामुळे शेतकरी आणि नागरिक मोठ्या अडचणीत आहेत.जलजीवन योजनेतील प्रचंड भ्रष्टाचारामुळे हजारो कोटी खर्चूनही महाराष्ट्र तहानलेलाच, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन…
-

भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला पीयूष गोयल यांचा विरोध; सुधारित धोरणासह नव्या जाहिरातीची सूचना
•
बोरीवलीतील भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या महापालिका प्रस्तावाला नागरिकांतून तीव्र विरोध होत असतानाच, केंद्रीय रेल्वे मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी या वादग्रस्त मुद्द्यावर हस्तक्षेप करत महापालिकेला जाहिरात रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी हे रुग्णालय सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्वाऐवजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चालवण्याचा आणि केवळ महात्मा फुले जनआरोग्य योजना…
-

२५ वर्षांत पाणी प्रश्न सुटला नाही; उद्धव सेनेची अप्रत्यक्ष कबुली
•
मुंबई शहरामध्ये सध्या सुरू असलेल्या पाण्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने महापालिकेच्या विभागीय कार्यालयांवर आंदोलने छेडली आहेत. मात्र, ही आंदोलने पाणी प्रश्नाच्या निराकरणासाठी कमी आणि पक्षातील निष्क्रियतेवर झटक देण्यासाठी अधिक असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या २५ ते ३० वर्षांपासून मुंबई महापालिकेवर सत्तेत असलेल्या या पक्षाने…
-

चीनमधील मॅरेथॉनची जगभरात चर्चा; 12 हजार माणसांसोबत धावले 20 रोबोट्स
•
चीनमधील यिझुआंगमध्ये झालेल्या मॅरेथॉनची चर्चा सध्या जगभरात होतीय. त्याचं कारण म्हणजे या मॅरेथॉनमध्ये माणसांसोबत रोबोटही धावले. होय यिझुआंगमध्ये झालेल्या मॅरेथॉनमध्ये 12 हजार माणसांसोबत 20 रोबोट्सही धावले. त्यातही महत्वाचं म्हणजे ही मॅरेथॉन जिंकली ती हाडा मासाच्या मानवी धावपटूने. यिझुआंग प्रांत म्हणजे चीनमधील अनेक मोठमोठाल्या टेक फर्म्सचा बालेकिल्ला मानला जातो. तिथे झालेल्या…
-

“कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येणं हा आमचा अंतर्गत प्रश्न; अजित पवार स्पष्टच बोलले
•
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील अनेक मतभेदाच्या बातम्या झाल्या. राजकीय व्यासपीठावर दोघांनी एकमेकांवर टीका केली. त्यामुळे कौटुंबिक कार्यक्रमात हे दोघे एकत्र येतील का? अशी अनेकदा चर्चा झाली आणि अजित पवार यांचा मुलगा जय पवार याच्या साखरपुड्याला शरद पवार उपस्थित होते. आता यावर अजित पवार यांनी…
-

मित्रहो, ही कुठली पत्रकारिता?
•
मराठी पत्रकारिता कुठल्या वळणावर पोहोचली आहे, हे मी पत्रकार असल्यामुळे जास्त कधी बोलत नाही. पण मराठी पत्रकारितेत झालेला हा लक्षणीय बदल अस्वस्थ करणारा आहे. त्यामुळे बोलावसं वाटलं. तुम्हीच पहा, आपल्या पत्रकारितेची घसरण दर्शविण्यासाठी आजच्या पुढील दोन बातम्या पुरेशा आहेत… माझ्यासाठी त्या बातम्या नसून, मन हादरवून टाकणारे पत्रकारितेचे विदारक स्वरुप आहे……
