Category: News and Updates

  • गुजरातमध्ये सत्तेचा मोठा ‘रिबूट’; मुख्यमंत्री सोडून सर्व १६ मंत्र्यांचा राजीनामा

    गुजरातमध्ये सत्तेचा मोठा ‘रिबूट’; मुख्यमंत्री सोडून सर्व १६ मंत्र्यांचा राजीनामा

    गुजरातच्या राजकारणात दिवाळीच्या अगोदरच मोठा सत्तापालट झाल्याने राज्याच्या राजकीय पटावर खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पदावर कायम ठेवत इतर सर्व १६ मंत्र्यांनी एकत्रितपणे राजीनामा दिला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेला हा फेरबदल ही केवळ मंत्रिमंडळ बदलाची कारवाई नसून एक योजनाबद्ध राजकीय डाव असल्याचं स्पष्ट होत आहे. या हालचालीमागे…

  • डिबेंचर कपातीविरोधात शेतकऱ्यांचा गोकुळवर मोर्चा; प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक

    डिबेंचर कपातीविरोधात शेतकऱ्यांचा गोकुळवर मोर्चा; प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक

    गोकुळ दूध संघच्या डिबेंचर कपातीच्या निर्णयावरून दूध उत्पादक शेतकरी आणि संघटनांमध्ये संघर्ष उफाळला आहे. डिबेंचर कपातीविरोधात शेतकऱ्यांनी गुरांसह ‘जवाब दो मोर्चा’ काढत प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली. हा मोर्चा शासकीय विश्रामगृहापासून गोकुळच्या कार्यालयापर्यंत काढण्यात आला. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, गोकुळने डिबेंचर रकमेतील सुमारे 40 टक्के कपात केली असून यामुळे त्यांच्या उत्पन्नावर…

  • बुलढाण्यात बोगस मतदार? आमदार संजय गायकवाड यांचा निवडणूक आयोगावर घणाघात

    बुलढाण्यात बोगस मतदार? आमदार संजय गायकवाड यांचा निवडणूक आयोगावर घणाघात

    बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात एक लाखांपेक्षा अधिक बोगस मतदारांची नावे मतदारयादीत असल्याचा गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. मृत व्यक्ती, स्थानांतरित अधिकारी यांची नावे अद्याप मतदारयादीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, निवडणूक आयोग बोगस नावे वगळण्यास टाळाटाळ करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. गायकवाड म्हणाले, “जिल्ह्यात…

  • युतीधर्म धोक्यात? बालाजी किणीकर यांचा भाजपला इशारा! “आमच्याकडेही यादी तयार आहे”

    युतीधर्म धोक्यात? बालाजी किणीकर यांचा भाजपला इशारा! “आमच्याकडेही यादी तयार आहे”

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असतानाच राज्यात पक्षबदलाचं सत्र जोरात सुरू झालं आहे. याच पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये मित्रपक्षांमध्येच राजकीय तणाव निर्माण झाला आहे. अलीकडेच शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांनी भारतीय जनता पक्ष मध्ये प्रवेश केला. यामुळे स्थानिक राजकारणात हलचल माजली आहे. 2015 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले यादव नंतर…

  • मनसेला आघाडीत घेण्यावरून राऊत–सपकाळांमध्ये तणाव; काँग्रेस हायकमांडकडे तक्रार

    मनसेला आघाडीत घेण्यावरून राऊत–सपकाळांमध्ये तणाव; काँग्रेस हायकमांडकडे तक्रार

    महाविकास आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) सामावून घेण्याबाबत मतभेद उफाळले आहेत. संजय राऊत यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात थेट काँग्रेसच्या हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सपकाळ यांनी मनसेला आघाडीत घेण्याबाबत नाराजी व्यक्त केल्याने हा वाद उफाळल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस वरिष्ठ नेत्यांना पत्र…

  • उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन, राजकीय चर्चांना उधाण

    उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन, राजकीय चर्चांना उधाण

    मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) दरवर्षी भव्य दीपोत्सवाचे आयोजन करते. यंदाच्या दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच दीपोत्सवावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. दरवर्षी दीपोत्सव…

  • भूपतीसह ६१ माओवादी आत्मसमर्पण, शहरी नक्षलवाद हेच खरं आव्हान : मुख्यमंत्री फडणवीस

    भूपतीसह ६१ माओवादी आत्मसमर्पण, शहरी नक्षलवाद हेच खरं आव्हान : मुख्यमंत्री फडणवीस

    गडचिरोलीत माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की बंदुकीचा नक्षलवाद संपत चालला असून आता शहरी नक्षलवाद हेच खरं आव्हान उरलं आहे. “अराजकतावाद्यांना आम्ही पराजित करू. संविधान न मानणाऱ्यांना बाबासाहेबांचं संविधान हरवेल,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. गडचिरोली पोलीस आणि राज्याच्या…

  • कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील सर्व 12 आरोपींना जामीन

    कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील सर्व 12 आरोपींना जामीन

    कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात आज मोठा निर्णय झाला आहे. कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडून आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर या तिघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वीच या प्रकरणातील नऊ आरोपींना जामीन मिळाला होता. त्यामुळे आता या खटल्यातील सर्व 12 आरोपींना जामीन मंजूर…

  • मीरा-भाईंदर आणि ठाण्यात पॉड टॅक्सी धावणार; वाहतुकीला नवा वेग

    मीरा-भाईंदर आणि ठाण्यात पॉड टॅक्सी धावणार; वाहतुकीला नवा वेग

    मुंबई : मुंबईनंतर आता मीरा-भाईंदर आणि ठाणे या शहरांमध्ये पॉड टॅक्सी प्रकल्प उभारला जाणार असून, यामुळे उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होणार आहे. महामुंबईत हा प्रकल्प राबवण्यासाठी एमएमआरडीए (महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण) सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणार आहे. या प्रकल्पांतर्गत एका पॉडकॅबमध्ये सुमारे…

  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य वाढवण्याची मागणी

    जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य वाढवण्याची मागणी

    राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये प्रत्येकी पाच आणि पंचायत समित्यांमध्ये प्रत्येकी दोन स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्याची मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये एकूण १७० तर सर्व पंचायत समित्यांमध्ये ७०२ स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होईल. सध्या अस्तित्वात…