Category: News and Updates
-

”निवडणुकीत २० हजार मतदार बाहेरून आणले” :आमदार विलास भुमरे, राजकीय वर्तुळात खळबळ
•
छत्रपती संभाजीनगर | पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल २० हजार मतदार बाहेरून आणल्याची कबुली दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही कबुली त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गटप्रमुख व बूथप्रमुखांच्या बैठकीत दिली. शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे संत एकनाथ रंगमंदिरात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री संजय…
-

मंत्र्यांना फर्मान : दिलेली आश्वासने ९० दिवसांत पूर्ण करा!
•
मुंबई : विविध बैठकींमध्ये मंत्री मंडळाने व शासनातील अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासने आता फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरविण्यासाठी राज्य सरकारने कडक भूमिका घेतली आहे. प्रत्येक विभागात सचिवांच्या अध्यक्षतेखाली “आढावा समिती” स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, या समित्या प्रत्येक पंधरवड्याला आश्वासनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणार आहेत. मंत्र्यांकडून विधानसभेत व परिषदेत वारंवार…
-

“लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय” सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वक्तव्याने वाद
•
“लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय,” असे विधान सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केल्याने राजकीय वर्तुळात आणि शेतकरी संघटनांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील घोडगाव येथे खासगी बँकेच्या कार्यक्रमात बोलताना मंत्री पाटील म्हणाले, “लोकांना वाटते की कर्जमाफी मिळेल, त्यामुळे अनेक जण घेतलेले कर्ज फेडत नाहीत. हा नाद लागला आहे.”…
-

शाळांमध्ये मराठीसह राज्यगीत गायन अनिवार्य करण्याचे शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
•
मुंबई – राज्यातील सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन आणि अध्यापन अनिवार्य असतानाच, आता राज्यगीत गायनही अनिवार्य करण्यात यावे, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत. मंत्रालयात झालेल्या राज्यातील विविध शिक्षण मंडळांच्या समन्वयक, प्राचार्य आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहविचार बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस शालेय…
-

नोबेल पुरस्कारावरून खळबळ! नेतान्याहू यांनी शेअर केला डोनाल्ड ट्रम्पचा एआय जनरेटेड फोटो
•
इस्त्रायल–हमास युद्धातील युद्धबंदी करारानंतर अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळावा अशी उघड मागणी केली असून, त्यासोबतच त्यांनी सोशल मीडियावर एक एआय जनरेटेड फोटो शेअर केला आहे. या फोटोत ट्रम्प यांनी गळ्यात नोबेल शांती पुरस्काराचे पदक…
-

देवेंद्र भुजबळ यांना ‘माध्यमभूषण’ पुरस्कार जाहीर
•
पनवेल – कोकणातील दि. म्हसळा टाइम्स या वृत्तपत्राच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि न्यूज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक श्री. देवेंद्र भुजबळ यांना यावर्षीचा “गौरव महाराष्ट्राचा: राज्यस्तरीय माध्यमभूषण पुरस्कार” जाहीर झाला आहे. हा पुरस्कार समारंभ रुक्मिणी पांडुरंग पोटले चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई आणि आदर्श शैक्षणिक समूह संचलित डी.…
-

आरे ते कफ परेड मेट्रोला विक्रमी प्रतिसाद; पहिल्याच दिवशी एक लाख प्रवासी
•
मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील आणखी एक ऐतिहासिक पाऊल म्हणून आरे ते कफ परेड मेट्रो-३ सेवा मंगळवारी पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या भूमिगत मेट्रोला पहिल्याच दिवशी तब्बल एक लाख आठ हजारांहून अधिक प्रवाशांचा विक्रमी प्रतिसाद मिळाला. पुढील दिवशी ही संख्या वाढून १…
-

जोगेश्वरीत भीषण घटना; सिमेंटच्या वीटेमुळे २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू, बांधकाम कंपनीवर गुन्हा दाखल
•
मुंबई : ९ ऑक्टोबर जोगेश्वरी येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत २२ वर्षीय संस्कृती अनिल अमीन हिचा सिमेंटच्या वीटेमुळे मृत्यू झाला आहे. ही वीट श्रद्धा कन्स्ट्रक्शनच्या बांधकामाधीन इमारतीवरून खाली पडली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही घटना बुधवारी सकाळी घडली, जेव्हा संस्कृती कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. काही अंतरावर गेल्यानंतर अचानक…
-

आश्रमशाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी गळफास लावून आयुष्य संपवलं
•
पालघर : वाडा तालुक्यातील आंबिस्ते खुर्द येथील अनुसूचित माध्यमिक आश्रमशाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह शाळेच्या परिसरातील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. याप्रकरणी…
-

नांदेड गुरुद्वारा बोर्ड बरखास्तीचा शासननिर्णय रद्द; २०२२ मधील बोर्डची पुनर्स्थापना करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश
•
नांदेड : नांदेड येथील सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब गुरुद्वारा बोर्ड बरखास्त करण्याचा राज्य शासनाचा जून २०२२ मधील निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या या महत्त्वपूर्ण निकालानुसार, तत्कालीन गुरुद्वारा बोर्डाची तशीच पुनर्स्थापना करण्याचा आदेश देण्यात आला आहे. राज्य शासनाने १९५६ मध्ये नांदेड गुरुद्वारा कायदा पारित करून…
