Category: News and Updates

  • सोन्याने पुन्हा विक्रमी झेप घेतली; ११ महिन्यांत तब्बल ५० हजार रुपयांची वाढ

    सोन्याने पुन्हा विक्रमी झेप घेतली; ११ महिन्यांत तब्बल ५० हजार रुपयांची वाढ

    जागतिक बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आणि अमेरिकन सरकारच्या शटडाऊनमुळे सोन्या-चांदीच्या किमतींनी नव्याने विक्रमी उच्चांक गाठला आहे. बुधवारी जळगावच्या सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर तोळ्यामागे तब्बल ₹१,२७,००० वर पोहोचला, तर चांदी ₹१,६०,००० रुपये किलो दराने स्थिरावली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सोन्याचा दर ₹७७,००० रुपये होता. म्हणजेच, अवघ्या ११ महिन्यांत सोन्याने ₹५०,०००…

  • आरे-कफ परेड मेट्रो आजपासून प्रवाशांसाठी सुरू; सकाळी ५.५५ वाजता सुटली पहिली गाडी

    आरे-कफ परेड मेट्रो आजपासून प्रवाशांसाठी सुरू; सकाळी ५.५५ वाजता सुटली पहिली गाडी

    मुंबई : मुंबईकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. आरे-कफ परेड या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवर आजपासून प्रवासी वाहतूक अधिकृतपणे सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी या मार्गिकेचे लोकार्पण झाले होते, आणि गुरुवारपासून (९ ऑक्टोबर) सकाळी ५.५५ वाजता पहिली मेट्रोगाडी प्रवासाला निघाली. एकूण ३३.५ किलोमीटर लांबीचा हा भुयारी…

  • महाराष्ट्रात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधांच्या विक्रीवर बंदी

    महाराष्ट्रात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधांच्या विक्रीवर बंदी

    मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे अनेक बालकांचे मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर एफडीएने राज्यातील औषध विक्रेत्यांना डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधे विकू नयेत, असा कठोर आदेश जारी केला आहे. एफडीएचे राज्य औषध नियंत्रण अधिकारी डॉ. श्रीनिवास शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कफ…

  • पुण्यात एटीएसची मोठी कारवाई; १९ संशयितांच्या घरांवर आणि कार्यालयांवर झडती

    पुण्यात एटीएसची मोठी कारवाई; १९ संशयितांच्या घरांवर आणि कार्यालयांवर झडती

    पुणे : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी उशिरा रात्री पुण्यातील कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणावर छापेमारी कारवाई केली. दहशतवादी विचारसरणीशी संबंधित काही व्यक्तींच्या हालचालींबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही मोहीम हाती घेण्यात आली. ही कारवाई संपूर्ण रात्री सुरू राहिली आणि गुरुवारी पहाटेपर्यंत चालली. मिळालेल्या माहितीनुसार, या मोहिमेत एटीएस आणि पुणे पोलिसांच्या…

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भव्य उद्घाटन: भारताचा पहिला पूर्णपणे डिजिटल विमानतळ

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भव्य उद्घाटन: भारताचा पहिला पूर्णपणे डिजिटल विमानतळ

    नवी मुंबई : भारताच्या पायाभूत विकास क्षेत्रातील एक ऐतिहासिक पाऊल म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा अधिकृतपणे उद्घाटन करण्यात आला. अंदाजे ₹19,650 कोटी खर्चून उभारण्यात आलेले हे विमानतळ आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक रचना आणि अत्याधुनिक सुविधा यासाठी विशेष ठरणार आहे. भारताचा पहिला ‘पूर्णपणे डिजिटल’…

  • बनावट सुसाईड नोटांचा भंडाफोड; पाच जणांवर गुन्हा दाखल

    बनावट सुसाईड नोटांचा भंडाफोड; पाच जणांवर गुन्हा दाखल

    लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, चाकूर आणि निलंगा तालुक्यांमधील तीन आत्महत्याग्रस्त प्रकरणांमध्ये बनावट सुसाईड नोट तयार करून पोलिसांना फसविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुख्य शासकीय दस्तऐवज परिक्षक गुन्हे परिक्षण विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्या अहवालानंतर या चिठ्ठ्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले असून पाच जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अहमदपूर तालुक्यातील…

  • धनुष्य-बाणावरून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी; नेमकं काय घडलं?

    धनुष्य-बाणावरून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी; नेमकं काय घडलं?

    महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक ठरणाऱ्या शिवसेनेच्या धनुष्य-बाण चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी पार पडली. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज जवळपास दोन महिन्यांनी सुनावणी झाली. या प्रकरणात पुढील सुनावणी दिवाळीनंतर होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. शिवसेनेतील फुटीनंतर निवडणूक आयोगाने धनुष्य-बाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले…

  • फक्त 56 मिनिटांत आरे ते कफ परेड प्रवास — मेट्रो 3 चा तिसरा टप्पा सुरू

    फक्त 56 मिनिटांत आरे ते कफ परेड प्रवास — मेट्रो 3 चा तिसरा टप्पा सुरू

    मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या मेट्रो 3 च्या तिसऱ्या टप्प्याचे आज (8 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या 9.77 किलोमीटरच्या भुयारी मार्गामुळे आता आरे ते कफ परेड हा 33.9 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 56 मिनिटांत म्हणजेच 3,360 सेकंदांत पूर्ण…

  • पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ११ ऑक्टोबरला ‘एसएमएस पाठवा आंदोलन’

    पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ११ ऑक्टोबरला ‘एसएमएस पाठवा आंदोलन’

    मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी राज्यातील पत्रकार आता आंदोलनाच्या मार्गावर उतरले आहेत. पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या वतीने ११ ऑक्टोबर रोजी ‘एसएमएस पाठवा आंदोलन’ करण्यात येणार असून या आंदोलनाद्वारे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हजारो संदेश पाठवून पत्रकार आपला रोष व्यक्त करणार आहेत. या आंदोलनानंतर २५…

  • बदलापूर लैंगिक अत्याचार आरोपीच्या ‘एन्काऊंटर’ प्रकरणात पोलिसांची निर्दोष सुटका

    बदलापूर लैंगिक अत्याचार आरोपीच्या ‘एन्काऊंटर’ प्रकरणात पोलिसांची निर्दोष सुटका

    मुंबई – बदलापूर येथे लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखालील आरोपी अक्षय शिंदेच्या पोलिस चकमकीत झालेल्या मृत्यूबाबत न्यायालयीन चौकशी समितीने पोलिसांना निर्दोष ठरवले आहे. माजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने सादर केलेला अहवाल राज्य सरकारने स्वीकारला आहे. आयोगाच्या निष्कर्षानुसार, पोलिसांनी आत्मरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा मान्य करण्यात आला आहे.…