Category: News and Updates
-

कर्जमाफीपेक्षा थेट मदत अधिक महत्त्वाची – फडणवीसांची भूमिका, राज्य सरकारकडून 31,628 कोटींचे मदत पॅकेज जाहीर”
•
मुंबई – राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दिलासा देत तब्बल 31,628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही मोठं विधान केलं. “आज कर्जमाफी करण्यापेक्षा थेट मदत करणं जास्त महत्त्वाचं आहे,” असं फडणवीस म्हणाले. फडणवीस म्हणाले, “आम्ही कर्जमाफीच्या आश्वासनापासून मागे गेलेलो…
-

शहांच्या दौऱ्याने सहकार ‘उजव्या’ दिशेला, नगरमध्ये भाजपकडून सहकाराचा प्रभावी वापर
•
शहांच्या दौऱ्याने सहकार ‘उजव्या’ दिशेला, नगरमध्ये भाजपकडून सहकाराचा प्रभावी वापर अहिल्यनगर – स्वातंत्र्यपूर्व काळापासून नगर जिल्ह्याचा झुकाव डाव्या विचारसरणीकडे राहिला होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून सहकारी चळवळीच्या माध्यमातून या जिल्ह्याचे राजकारण हळूहळू उजव्या विचारांकडे वळत आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या नुकत्याच झालेल्या नगर दौऱ्याने या बदलाला…
-

टाटा-स्वामिनाथन करारातून ग्रामीण विकासाला नवी गती : मुख्यमंत्री फडणवीस
•
टाटा-स्वामिनाथन करारातून ग्रामीण विकासाला नवी गती : मुख्यमंत्री फडणवीस राज्यात विकासाचे नवे पर्व : मुख्यमंत्री फडणवीस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन आणि टाटा मोटर्स फाउंडेशनमध्ये करार मुंबई – राज्यात ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि पोषण सुरक्षेला नवे बळ देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. कृषी विभाग, ग्रामीण विकास विभाग, एम.एस.…
-

अॅप आधारित टॅक्सी सेवा गुरुवारी बंद राहणार
•
मुंबई : अॅप आधारित कॅब, टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवार, ९ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यभर एकदिवसीय बंदची हाक दिली आहे. या बंदचे आवाहन भारतीय गिग कामगार मंचाने केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौर्याच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाद्वारे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. चालकांचे…
-

परिवहनमंत्र्यांच्या बैठकीकडे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष
•
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांच्या थकित देयकांबाबत सोमवारी कामगार कृती समिती आणि महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसे यांची बैठक पार पडली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या. मात्र, महामंडळाने आर्थिक मागण्यांबाबत असमर्थता व्यक्त केली. परिणामी, मंगळवारी परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या…
-

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल 31 हजार 628 कोटींचं मदत पॅकेज जाहीर
•
मुंबई | राज्यातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारने आज मोठा दिलासा दिला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 31 हजार 628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली. राज्यातील 29 जिल्हे, 253 तालुके आणि 2,059 मंडळांमधील शेतकऱ्यांना या पॅकेजचा लाभ मिळणार आहे. या पॅकेजनुसार कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी 18,500 रुपये,…
-

सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न, सुरक्षा रक्षकांच्या तत्परतेने अनर्थ टळला
•
नवी दिल्ली | देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आज एक धक्कादायक प्रकार घडला. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, सुनावणीदरम्यान त्या वकिलाने अचानक सरन्यायाधीशांच्या जवळ जाऊन बूट फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्या वकिलाला जागेवरच अडवले आणि कोर्टात संभाव्य अनर्थ टळला. घटनेनंतर…
-

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र सरकारकडून भरघोस मदतीचे आश्वासन – अमित शाहांचा शब्द
•
लोणी (अहिल्यानगर): महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान लक्षात घेता केंद्र सरकार राज्याला भरघोस मदत करणार असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली आहे. राज्य सरकारकडून नुकसानीचा सविस्तर अहवाल प्राप्त होताच केंद्राकडून निधी वितरित करण्यात येईल, असे ते म्हणाले. लोणी येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त…
-

लंडन, न्यूयॉर्कनंतर मुंबईही ‘दोन विमानतळांचं शहर’; दोन लाख रोजगारनिर्मितीची अपेक्षा
•
नवी मुंबई | मुंबई आता लंडन, न्यूयॉर्क, पॅरिस आणि इस्तंबूलप्रमाणे दोन विमानतळ असलेले शहर बनणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ६ ऑक्टोबर रोजी होणार असून, या प्रकल्पामुळे दोन लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीची अपेक्षा आहे. विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात एक टर्मिनल आणि एक धावपट्टी (रनवे) कार्यरत…
-

शासकीय रुग्णालयांना बनावट औषधांचा पुरवठा; आरोग्य विभाग सतर्क
•
यवतमाळ / अमरावती : राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कफ सिरपमुळे बालकांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून अन्न व औषध प्रशासन विभागाने व्यापक तपासणी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात अनेक रुग्णालयांना बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ही औषधे स्थानिक…
