Category: News and Updates
-

राज्यातील नगर परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; ओबीसी, महिला उमेदवारांसाठी मोठी संधी
•
मुंबई – राज्यातील आगामी “मिनी विधानसभा” मानल्या जाणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्य सरकारने सोमवारी नगर परिषद अध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर केले असून, 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे. या आरक्षणात महिलांना आणि ओबीसी प्रवर्गाला मोठा वाटा मिळाला आहे. राज्यातील 67 नगर परिषदांच्या…
-

३३ नगरपरिषदापैकी १७ नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर – देऊळगावराजा – महिला प्रवर्ग आरक्षित मोहोळ – महिला प्रवर्ग आरक्षित तेल्हारा – महिला प्रवर्ग आरक्षित ओझर – महिला प्रवर्ग आरक्षित वानाडोंगरी – महिला प्रवर्ग आरक्षित भुसावळ – महिला प्रवर्ग आरक्षित घुग्गूस – महिला प्रवर्ग आरक्षित चिमूर – महिला प्रवर्ग आरक्षित शिर्डी – महिला प्रवर्ग आरक्षित सावदा- महिला प्रवर्ग आरक्षित मैनदर्गी – महिला प्रवर्ग आरक्षित दिगडोहदेवी – महिला प्रवर्ग आरक्षित दिग्रस- महिला प्रवर्ग आरक्षित अकलूज – महिला प्रवर्ग आरक्षित बीड – महिला प्रवर्ग आरक्षित शिरोळ – महिला प्रवर्ग आरक्षित
•
नवी दिल्ली | कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डीपफेक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे सेलिब्रेटींच्या नाव, आवाज आणि प्रतिमेच्या गैरवापरावर अंकुश ठेवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये न्यायालयाने अभिनेता अमिताभ बच्चन यांना त्यांच्या नाव, आवाज आणि चेहऱ्याच्या गैरवापरापासून संरक्षण देणारा आदेश दिला होता. या निर्णयानंतर न्यायव्यवस्थेने अनेक अशा…
-

महाराष्ट्रात 10,309 उमेदवारांना अनुकंपा नियुक्ती पत्रांचे वितरण
•
मुंबई | राज्य सरकारच्या अनुकंपा नियुक्ती योजनेअंतर्गत शनिवारी तब्बल 10,309 उमेदवारांना नियुक्ती पत्रे वाटप करण्यात आली. सेवेत असताना निधन झालेले किंवा कामाच्या ठिकाणी अपघातामुळे कायमस्वरूपी अपंग झालेले सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक स्थैर्य व उपजीविकेचा आधार मिळावा, या उद्देशाने ही योजना राबवली जाते. कोकण विभागात सर्वाधिक नियुक्त्या या नियुक्त्यांपैकी 3,078 कोकण…
-

अमेरिकेत तेलंगणातील विद्यार्थ्याची गोळी झाडून हत्या; परत आणण्यासाठी कुटुंबाची सरकारकडे विनंती
•
डॅलस (अमेरिका) – हैद्राबादचा रहिवासी व 27 वर्षीय भारतीय विद्यार्थी चंद्रशेखर पोल याची अमेरिकेतील डॅलस येथे गोळी झाडून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री पेट्रोल पंपावर ड्युटीवर असताना घडली. पोलवर एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला असून त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. चंद्रशेखर पोल हा 2023 साली उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला…
-

शिरोडा-वेळागर किनाऱ्यावर भीषण दुर्घटना; आठ पर्यटक बुडाले, तिघांचा मृत्यू
•
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर किनाऱ्यावर शनिवारी दुपारी पर्यटनासाठी आलेल्या आठ पर्यटकांच्या बुडण्याची भीषण घटना घडली. यापैकी तिघांचा मृत्यू झाला असून एक महिला पर्यटक गंभीर जखमी आहे. उर्वरित चार पर्यटकांचा शोध स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाकडून सुरु आहे. ही घटना दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. बेळगाव येथील कित्तूर कुटुंब आणि त्यांच्या नातेवाईकांनी कुडाळ…
-

राज्यात नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत; ६ ऑक्टोबरला मंत्रालयात प्रक्रिया
•
मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदांच्या आरक्षणाबाबतची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नगरविकास विभागाने येत्या ६ ऑक्टोबर रोजी मंत्रालयात नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेतला असून, या प्रक्रियेकडे संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राज्यात एकूण २४५ नगरपालिका आणि ३९५ नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित होणार आहे. कोणत्या शहरात कोणत्या…
-

नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
•
मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आता लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती देत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्य सरकारने या प्रस्तावाला मान्यता देण्याची विनंती केली होती. पंतप्रधानांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून विमानतळाच्या नामकरणाची प्रक्रिया…
-

बेकायदा फलकांवरून न्यायालयाचा संताप; अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात
•
मुंबई : शहर आणि जिल्ह्यांमध्ये वाढत्या बेकायदा फलकांच्या तक्रारींवर योग्य ती कारवाई न केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश देत शासनाला कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींनंतरही महानगरपालिका, पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून कारवाई होत…
-

केंद्र सरकारने पशुखाद्य निर्यातीवरील बंदी उठवली; शेतकरी व उद्योगांना मोठा दिलासा
•
नवी दिल्ली : केंद्र सरकारने पशुखाद्य उद्योगाला मोठा दिलासा दिला आहे. गेल्या एका वर्षापासून लागू असलेली तेलमुक्त तांदळाच्या कोंड्याच्या निर्यातीवरील बंदी अखेर हटवण्यात आली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) शुक्रवारी अधिसूचनेद्वारे हा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे देशातील पशुखाद्य उद्योग, प्रक्रिया उद्योग तसेच शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. खाद्यतेल उद्योग…
-

आजपासून चेक क्लिअरिंगला नवा वेग; काही तासांत खात्यात पैसे
•
मुंबई : बँकिंग क्षेत्रातील ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. आता चेक (धनादेश) क्लिअर होण्यासाठी दोन दिवस थांबावे लागणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चेक क्लिअरिंग सिस्टीममध्ये केलेल्या सुधारणांमुळे आजपासून धनादेश काही तासांतच पास होऊन रक्कम थेट खात्यात जमा होणार आहे. आरबीआयच्या नव्या नियमांनुसार शनिवारीपासून विद्यमान चेक ट्रान्झक्शन सिस्टीम (CTS) मध्ये…
