Category: News and Updates

  • विद्यार्थ्यांसाठी ऑक्सफर्ड बिग रीड स्पर्धा; नोंदीसाठी 30 ऑक्टोबरपर्यंत मुदत

    विद्यार्थ्यांसाठी ऑक्सफर्ड बिग रीड स्पर्धा; नोंदीसाठी 30 ऑक्टोबरपर्यंत मुदत

    चेन्नई : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑक्सफर्ड बिग रीड या आंतरराष्ट्रीय वाचन स्पर्धेसाठी भारतासह विविध देशांतील शाळांकडून नोंदी मागविण्यात आल्या आहेत. इयत्ता 1 वी ते 9 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होता येणार असून नोंदी सादर करण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर 2025 आहे. ही स्पर्धा तीन गटांमध्ये विभागली…

  • पंतप्रधान मोदी शुक्रवारी महिलांच्या खात्यात जमा करणार ७,५०० कोटी

    पंतप्रधान मोदी शुक्रवारी महिलांच्या खात्यात जमा करणार ७,५०० कोटी

    पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या शुक्रवारी बिहारमधील ७५ लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण योजनेतून प्रत्येकी १० हजार रुपये जमा करणार आहेत. या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन मिळणार असून महिलांच्या आर्थिक सबलीकरणाचा मार्ग खुला होणार आहे. ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ अंतर्गत या मदतीचा पहिला टप्पा…

  • असमचे लोकप्रिय गायक जुबीन गर्ग यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

    असमचे लोकप्रिय गायक जुबीन गर्ग यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

    गुवाहाटी : असमचे प्रख्यात गायक व संगीतकार जुबीन गर्ग यांचा शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार मंगळवारी सोनापूरजवळील कामरकुची गावात करण्यात आला. गुवाहाटीपासून सुमारे 30 किमी अंतरावर झालेल्या या अंत्ययात्रेला लाखो चाहत्यांनी हजेरी लावली. गर्ग यांच्या मृतदेहाला रविवारी सिंगापूरहून नवी दिल्लीमार्गे गुवाहाटीत आणण्यात आले होते. त्यानंतर तब्बल 48 तासांहून अधिक काळ त्यांचे पार्थिव…

  • सरकारला अल्टीमेटम : पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पत्रकारांचे रणशिंग

    सरकारला अल्टीमेटम : पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पत्रकारांचे रणशिंग

    मुंबई : राज्यातील पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध पत्रकार संघटनांनी पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारला जाग आणण्याचा निर्धार केला आहे. यासाठी आज मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नुकत्याच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या पत्रकारांवरील हल्ल्यांचा या बैठकीत तीव्र शब्दात…

  • राज्यात नवे 20 जिल्हे व 81 तालुके प्रस्तावित; जनगणनेनंतर होणार निर्णय

    राज्यात नवे 20 जिल्हे व 81 तालुके प्रस्तावित; जनगणनेनंतर होणार निर्णय

    चंद्रपूर : महाराष्ट्रात 20 नवे जिल्हे आणि 81 नवे तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र यावर निर्णय घेण्यासाठी नव्या जनगणनेची आकडेवारी येणे आवश्यक असल्याचे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. चंद्रपुरात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. बावनकुळे म्हणाले, “राज्यातील लोकसंख्या आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन नवीन जिल्हे व तालुके…

  • महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठी 2100 कोटींच्या मदतीची घोषणा

    महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठी 2100 कोटींच्या मदतीची घोषणा

    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (23 सप्टेंबर) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यभरातील 70 लाख एकरांपेक्षा जास्त क्षेत्र पावसामुळे बाधित झाले असून, यासाठी सरकारने 2100 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना…

  • धाराशिव-बीड-लातूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार; लाखो हेक्टर शेती पाण्यात

    धाराशिव-बीड-लातूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार; लाखो हेक्टर शेती पाण्यात

    मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे घरात व शेतात पाणी शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असून अनेक जनावरांचेही जीव गेले आहेत. गोठ्यात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही प्रचंड झाले आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा आणि औसा तालुक्यातील गावांना,…

  • आजपासून ओला-उबर चालक आकारणार सरकारमान्य भाडे

    आजपासून ओला-उबर चालक आकारणार सरकारमान्य भाडे

    मुंबई : अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या ओला-उबरसारख्या कंपन्यांच्या दरांवर सरकारने अंकुश बसवला आहे. परिवहन विभागाने जाहीर केलेल्या नव्या अधिसूचनेनुसार आजपासून चालकांनी फक्त सरकारमान्य दरानेच भाडे आकारायचे असून, त्याचे उल्लंघन केल्यास थेट कंपन्यांवरच कारवाई केली जाणार आहे. छोट्या गाड्यांसाठी किमान 28 रुपये आणि मोठ्या गाड्यांसाठी 38 रुपये बेसिक भाडे निश्चित…

  • पत्राचाळ घोटाळा : प्रवीण राऊत व जितेंद्र मेहता अडचणीत, PMLA न्यायालयाचा आदेश

    पत्राचाळ घोटाळा : प्रवीण राऊत व जितेंद्र मेहता अडचणीत, PMLA न्यायालयाचा आदेश

    मुंबईतील बहुचर्चित ₹१,०३९ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्यामध्ये विशेष PMLA न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने प्रवीण राऊत, बिल्डर जितेंद्र मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. प्रवीण राऊत हे शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांचे भाऊ आहेत. या प्रकरणाची सुरुवात २००७ मध्ये झाली. गुरूआशीष कन्स्ट्रक्शन्स (HDILची…

  • पद्मश्री अच्युत पालव यांचा नवरात्रोत्सवी अनोखा प्रयोग; ९ दिवस ९ पोस्टकार्ड

    पद्मश्री अच्युत पालव यांचा नवरात्रोत्सवी अनोखा प्रयोग; ९ दिवस ९ पोस्टकार्ड

    मुंबई : नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने प्रसिद्ध सुलेखनकार आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त अच्युत पालव यांनी यावर्षी एक अनोखा प्रयोग साकारला आहे. महाराष्ट्र व गोवा सर्कलचे पोस्टमास्टर जनरल यांच्या वतीने नवरात्रीसाठी खास नऊ पोस्टकार्ड्स तयार करण्यात आली असून, या पोस्टकार्ड्सना सांस्कृतिक आणि कलात्मक स्पर्श देण्यात आला आहे. या पोस्टकार्ड्सची शब्दरचना रुपाली ठोंबरे,…