”पहलगाम हल्ल्यालाही नेहरूजी जबाबदार आहेत का?” प्रसिद्ध गायिकेची नरेंद्र मोदींवर टीका

काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या हल्ल्याचा भारतासह जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. कलाक्षेत्रातूनही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अशातच लोक गायिका नेहा सिंह राठोडने या घटनेवरुन मोदी सरकारला घेरले आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरून नेहाने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. हल्ल्यासंदर्भात तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे नेहाने एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि मोदी सरकारवर टीका करत काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. या व्हिडीओमध्ये तिने असं म्हटलं आहे की “काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात पर्यटकांचा मृत्यू झाला. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. नोटबंदी करून तुम्ही दहशातवाद्यांचे कंबरडे मोडले होते. मग हे कसे घडले? किती काळ देश वक्तृत्वाने चालवणार? की या हल्ल्यालाही आता नेहरूजी जबाबदार आहेत का? कोणताही पत्रकार तुम्हाला प्रश्न विचारणार नाही. तुम्ही कोणतीही पत्रकार परिषद घेणार नाही आणि कोणतीही जबाबदारी घेणार नाही. संपूर्ण देशाला हे आधीच माहित आहे. पण, मी तुम्हाला प्रश्न विचारेन”, असं ती म्हणाली.

यापुढे तिने प्रश्न विचारत म्हटलं आहे की, “तुमच्या छप्पन इंच छातीचा आणि लाल डोळ्यांचा काय
उपयोग? सर्जिकल स्ट्राईक खरोखरच एक कथा होती का? कलम ३७० वर मोठ्या गप्पा मारून काय उपयोग? पुलवामा हल्ल्यात जवान शहीद झाले. पहलगाम हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू झाला. मोदीजी. मला सांगा, काश्मीरचे स्वातंत्र्य दहशातवाद्यांच्या दयेवर अवलंबून आहे का? मोदीजी, कृपया उत्तर द्या. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या नावाखाली मते मिळवण्याचे आणि देशवासीयांचे मृतदेह गोळा करण्याचे काम किती काळ सुरू राहणार? असा संतप्त सवाल तिने केला आहे.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *