मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील आपत्ती व्यवस्थापन परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना संधी देण्यात आली होती, मात्र दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यात स्थान देण्यात आले नव्हते. या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर अखेर शिंदे यांचाही प्राधिकरणात समावेश करण्यात आला आहे. शिवसेनेत याबाबत नाराजी होती, कारण अजित पवारांना संधी देऊनही शिंदे यांना वगळण्यात आले होते. परिणामी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप करून शिंदे यांच्या समावेशास मंजुरी दिली.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संरचनेनुसार संबंधित खात्यांचे मंत्री यामध्ये सहभागी होतात. याआधी नगरविकास मंत्र्यांचा समावेश नव्हता. विशेष म्हणजे, शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात फडणवीस हे गृहमंत्री या नात्याने प्राधिकरणात होते. त्याच काळात इर्शाळवाडी दुर्घटना घडली, तेव्हा शिंदे यांनी पावसात कठीण मार्ग पार करत मदतकार्य पोहोचवले होते. याशिवाय, राज्यातील अनेक नैसर्गिक आपत्तींच्या वेळी त्यांनी त्वरित मदतीसाठी पुढाकार घेतला होता. या पार्श्वभूमीवर त्यांना प्राधिकरणात स्थान मिळावे, अशी शिवसेना नेत्यांची भूमिका होती.
या मुद्द्यावर तीव्र चर्चा आणि टीकेनंतर अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना शिंदे यांच्या समावेशाचा आदेश दिला. मात्र, या निर्णयाविषयी विचारले असता, “कोठेही आपत्ती आली, तर मी नेहमीच मदतीसाठी धावून जातो. मात्र प्राधिकरणातील समावेशाबाबत कोणतीही माहिती नाही,” असे शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.

महायुतीत ‘आपत्ती’ व्यवस्थापन! एकनाथ शिंदेंच्या समावेशासाठी नियमात बदल
•
Please follow and like us:
Leave a Reply