मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाने भाविकां साठी नवीन ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार, तोकडे, अंगप्रदर्शन करणारे किंवा फाटलेले कपडे परिधान केलेल्या व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिर प्रशासनाने भाविकांनी सुसंस्कृत आणि अंगभर कपडे, विशेषतः भारतीय पारंपरिक वेशभूषा परिधान कराव्यात, असा स्पष्ट आदेश दिला आहे.
हा ड्रेस कोड पुढील आठवड्यापासून लागू होणार, प्रभादेवी येथे स्थित सिद्धीविनायक मंदिरात देशभरातून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, अनेक भक्तांनी मंदिरातील काही भाविकांचा पोशाख हा अशोभनीय असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मंदिर न्यासाने हा निर्णय घेतला असून, पुढील आठवड्यापासून नव्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
या कपड्यांवर असेल बंदी
मंदिर न्यासाने स्पष्ट केलं आहे की, संस्कृतीला धरून नसलेले कपडे किंवा शरीराचे प्रदर्शन करणारा पोशाख घालून आल्यास प्रवेश नाकारला जाईल. यामध्ये पुढील प्रकारच्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे :
फाटलेले, कापलेले किंवा विद्रूप कपडे, शॉर्ट स्कर्ट, अत्यंत लहान किंवा अतिशय घट्ट कपडे अंगप्रदर्शन करणारे कपडे किंवा संकोच वाटावा असा पोशाख
भाविकांच्या तक्रारीनंतर निर्णय
सिद्धीविनायक मंदिर न्यासाने सांगितले की, भाविकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या की काही लोक अनुचित पोशाख घालून मंदिरात प्रवेश करत आहेत. मंदिरात येताना भक्तांनी पवित्रतेचा आदर राखावा, या उद्देशानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे न्यासाने स्पष्ट केले आहे.
मंदिराच्या पावित्र्याच्या रक्षणासाठी हे पाऊल मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय कोणत्याही व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी नसून मंदिराचा पवित्र माहोल कायम ठेवण्यासाठी आहे. तसेच, सर्व भाविकांना मंदिरात प्रवेश करताना आत्मिक शांती व भक्तीभाव अनुभवता यावा, यासाठी हा नियम करण्यात आला आहे.
नवीन ड्रेस कोडची कठोर अंमलबजावणी
भाविकांनी येत्या आठवड्यापासून योग्य पोशाख घालूनच मंदिरात यावे, अन्यथा प्रवेश नाकारला जाईल, असे मंदिर न्यासाने स्पष्ट केले आहे. मंदिरातील पावित्र्य आणि शिस्त कायम ठेवण्यासाठी हा नियम सक्तीने पाळला जाणार आहे, असे प्रशासनाने सांगितले आहे.
Leave a Reply