मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जलद संवाद प्रणालीच्या साहाय्याने सज्ज असलेले हे केंद्र आपत्तीच्या वेळी अधिक अचूक, गतिमान आणि परिणामकारक प्रतिसाद देणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन क्षमतेला नवे बळ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे बळकटीकरण मिळाले आहे. उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या केंद्राबाबत बोलताना सांगितले की, हे केंद्र जलद निर्णय घेण्यासाठी, गतीने कृती आरंभ करण्यासाठी आणि एकात्मिक समन्वयासाठी उपयुक्त ठरणार आहे.” हवामानातील बदलांमुळे आपत्तींच्या स्वरूपात सातत्याने बदल होत असल्याने, सशक्त कमांड व कम्युनिकेशन सिस्टम ही काळाची गरज झाली आहे.
फडणवीस यांनी यावेळी माहिती दिली की, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्येही अशा प्रकारची आधुनिक केंद्रे उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आपत्ती टाळता येत नाही, पण तिच्याशी लढण्यासाठी आपण पूर्ण सज्ज आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकल्पाचे कौतुक करताना म्हटले, “ही अत्यंत आधुनिक आणि सुसज्ज यंत्रणा महाराष्ट्राला आपत्ती व्यवस्थापनात अधिक सक्षम आणि अग्रगण्य बनवेल.

आपत्तीच्या संकटावर स्मार्ट नियंत्रण;मंत्रालयात ‘राज्य आपत्कालीन कार्य केंद्रा’चे भव्य उद्घाटन
•
Please follow and like us:
Leave a Reply