उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील विकास आणि रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन परदेशी आणि विंटेज ऑटोमोबाईल्स व मोटारसायकलींच्या पुनर्संचयित उद्योगासाठी ठाण्याला केंद्र बनवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यांनी या उद्योगाच्या व्यवहार्यतेचे मूल्यांकन करून योग्य धोरण तयार करण्याची सूचना केली आहे.
ठाण्यात आयोजित ऑटोफेस्ट २०२५ प्रदर्शनात शिंदे बोलत होते, ज्यामध्ये ५८० पेक्षा जास्त व्हिंटेज आणि लक्झरी मोटारगाड्या तसेच मोटारसायकलींचे प्रदर्शन करण्यात आले. रेमंड समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी या उद्योगातून स्थानिक रोजगार निर्मिती आणि परकीय चलन वाढीचा लाभ ठाण्याला मिळू शकतो, असे स्पष्ट केले.
शिंदे म्हणाले, “परदेशी ऑटोमोबाईल रिस्टोरेशनमध्ये तज्ञ असलेल्या उद्योगासाठी ठाण्यात भरपूर वाव आहे. मी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना व्यवहार्यता अभ्यास करून धोरण तयार करण्याची विनंती केली आहे. या उपक्रमामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, व्यावसायिक प्रशिक्षणाचा लाभ मिळेल, तसेच निर्यात आणि परकीय महसूल वाढेल.”
या फेस्टमध्ये प्रदर्शित वाहनांचे एकत्रित मूल्य १००० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे नमूद करताना, शिंदे यांनी सिंघानिया समूहाचे अभिनंदन केले. त्यांनी ठाणेकरांना या ऐतिहासिक आणि दुर्मिळ वाहनांच्या साक्षीदार होण्याची संधी दिल्याबद्दलही समाधान व्यक्त केले. शिंदे यांनी ठाण्याच्या पायाभूत सुविधांचा उल्लेख करताना सांगितले की, मेट्रो, महामार्ग आणि इतर प्रगत सुविधांमुळे ठाणे आता उच्चभ्रू शहरी केंद्रांमध्ये सामील झाले आहे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यासाठी महत्वाकांक्षी योजना; व्हिंटेज ऑटो रिस्टोरेशन हबचा प्रस्ताव
•
Please follow and like us:
Leave a Reply