Category: News and Updates

  • अनगर नगरपंचायतीत तणाव; एनसीपी उमेदवार उज्वला थिटे यांचा कडेकोट पोलिस बंदोबस्तात अर्ज दाखल

    अनगर नगरपंचायतीत तणाव; एनसीपी उमेदवार उज्वला थिटे यांचा कडेकोट पोलिस बंदोबस्तात अर्ज दाखल

    अनगर (सोलापूर) येथील नगरपंचायत निवडणुकीत सोमवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. एनसीपी (अजित पवार गट) यांच्या उमेदवार आणि शेतकरी महिला उज्वला थिटे यांनी जीवाच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विरोधकांकडून वारंवार अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे करताच सोलापूर पोलिसांनी एसआरपीएफसह मोठा बंदोबस्त तैनात केला होता.…

  • केंद्र सरकारकडून ‘गोपाल रत्न’ पुरस्कार जाहीर; कोल्हापूरच्या अरविंद पाटील यांचा होणार गौरव

    केंद्र सरकारकडून ‘गोपाल रत्न’ पुरस्कार जाहीर; कोल्हापूरच्या अरविंद पाटील यांचा होणार गौरव

    केंद्र सरकारच्या पशुपालन व दुग्धव्यवसाय मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारांची (NGRA) घोषणा यंदासाठी करण्यात आली असून, महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील शेतकरी अरविंद यशवंत पाटील यांनी देशातील सर्वोत्तम दुग्धव्यवसायिक म्हणून मानाचा पुरस्कार पटकावला आहे. स्थानिक जातीच्या गायी-म्हशींचे संगोपन, संवर्धन आणि उत्कृष्ट दुधउत्पादन पद्धतींच्या माध्यमातून त्यांनी आदर्श ठरवला असल्याचे मंत्रालयाने…

  • मुंबई–ठाण्यात CNG पुरवठा संकट कायम; रिक्षा-टॅक्सी वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल वाढले

    मुंबई–ठाण्यात CNG पुरवठा संकट कायम; रिक्षा-टॅक्सी वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल वाढले

    मुंबई आणि ठाणे परिसरात गेल तीन दिवसांपासून CNG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून रिक्षा-टॅक्सी वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. वडाळ्यातील गेल (GAIL) कंपनीच्या मुख्य पाइपलाईनमध्ये रविवारी दुपारी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील CNG पुरवठा थांबला. अनेक CNG पंप बंद पडले, तर उघड्या पंपांवर प्रचंड…

  • अनुसूचित जातींसाठी ‘क्रीमी लेयर’ची गरज असल्याचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मत

    अनुसूचित जातींसाठी ‘क्रीमी लेयर’ची गरज असल्याचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मत

    सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई निवृत्तीला केवळ एक आठवडा बाकी असताना आरक्षण धोरणासंदर्भात मोठे विधान केले आहे. “अनुसूचित जातींमधून क्रीमी लेयर वगळली पाहिजे, ही माझी भूमिका आजही ठाम आहे,” असे ते म्हणाले. “India and the Living Indian Constitution at 75 Years” या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आरक्षणाच्या सध्याच्या स्वरूपावर पुनर्विचार करण्याची…

  • कागलमध्ये ‘चंदगड पॅटर्न’ची पुनरावृत्ती; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, मुश्रीफ घाटगे एकत्र, मंडलिकांचा गट एकाकी

    कागलमध्ये ‘चंदगड पॅटर्न’ची पुनरावृत्ती; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, मुश्रीफ घाटगे एकत्र, मंडलिकांचा गट एकाकी

    कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत अवघ्या 24 तासांत राजकीय चित्र पालटले असून ‘चंदगड पॅटर्न’ आता कागलमध्येही आकाराला आला आहे. दोन्ही राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शरद पवार गट—एकाच व्यासपीठावर आले आहेत. मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांच्यात झालेल्या अनपेक्षित आघाडीमुळे कागलमधील सत्तेचं गणित पूर्णपणे बदललं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला शरद पवारांच्या…

  • रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीत, मुलगा अनिकेतराजे शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी रिंगणात

    रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीत, मुलगा अनिकेतराजे शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी रिंगणात

    नगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असताना सातारा जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. फलटणमध्ये निंबाळकर घराण्यातील दोन गट पुन्हा एकदा आमने–सामने आले आहेत. रामराजेंच्या मुलाचा शिवसेनेतून प्रवेश, अध्यक्षपदासाठी मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून फलटण…

  • दुर्धर आजारानंतरही संजय राऊतांमधील शिवसैनिक जागा; मास्क लावून बाळासाहेबांना अभिवादन

    दुर्धर आजारानंतरही संजय राऊतांमधील शिवसैनिक जागा; मास्क लावून बाळासाहेबांना अभिवादन

    राज्यसभा खासदार आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत गेल्या काही आठवड्यांपासून गंभीर आजारामुळे सार्वजनिक जीवनापासून दूर होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी 31 ऑक्टोबर रोजी दोन महिन्यांसाठी राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून पूर्ण विश्रांती घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू राहिले आणि काही दिवसांपूर्वीच ते घरी परतले. डॉक्टरांनी घराबाहेर न…

  • बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाकडून मृत्युदंड

    बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाकडून मृत्युदंड

    बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने मानवतेविरुद्ध गुन्हे केल्याच्या आरोपात मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्याने दक्षिण आशियातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. २०२४ मध्ये बांगलादेशात झालेल्या व्यापक आंदोलनादरम्यान सरकारी कारवाईत अनेक नागरिकांचा मृत्यु झाला होता. या घटनांमध्ये हसीना यांच्यावर निषेधकर्त्यांवर जीवघेणी आणि अत्यधिक दडपशाही करण्याचे आदेश दिल्याचा आरोप ठेवण्यात…

  • राजन साळवींच्या मुलाला उमेदवारी नकारली, रत्नागिरीत नवे राजकीय समीकरण

    राजन साळवींच्या मुलाला उमेदवारी नकारली, रत्नागिरीत नवे राजकीय समीकरण

    रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या स्थानिक राजकारणात मोठा बदल घडवून आणणारा निर्णय समोर आला आहे. शिंदे सेनेचे राजन साळवी यांच्या मुलाला, अथर्व साळवी यांना, प्रभाग क्रमांक  मधून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गट सोडून शिंदे गटात गेलेल्या राजन साळवींसाठी हा अनपेक्षित झटका मानला जात आहे. मिळालेल्या…

  • त्रिभाषा धोरणावर जनमत जाणून घेण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांचे आवाहन

    त्रिभाषा धोरणावर जनमत जाणून घेण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांचे आवाहन

    मुंबई: महाराष्ट्र शासनाने राज्यातील शिक्षण व्यवस्थेमधील भाषिक धोरण अधिक सक्षम आणि समतोल करण्यासाठी “त्रिभाषा धोरण समिती”ची स्थापना केली आहे. या समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी राज्यातील सर्व सुजाण नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. समितीने https://tribhashasamiti.mahait.org/ या संकेतस्थळावर सर्वसामान्यांसाठी प्रश्नावली उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये नागरिकांच्या अपेक्षा,…