Category: News and Updates
-

“ते काश्मीरचे पाहुणे आहे”, म्हणत त्याने दहशतवाद्याची रायफल धरली; घोडेवाल्या सय्यद हुसेन शाहलाही त्यांनी गोळ्या मारल्या
•
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका काश्मिरी तरुणालाही आपला जीव गमवावा लागला. सय्यद हुसेन शाह असे त्याचे नाव आहे. पहलगामजवळील अश्मुकाम येथील रहिवासी सय्यद हुसेन शाह घोडेस्वार म्हणून काम करायचा. तो पर्यटकांना त्याच्या घोड्यावरून फिरवत असे. त्याचे वडील सय्यद हैदर शाह यांनी एएनआयला सांगितले की, मंगळवारी हल्ल्याच्या दिवशी तो…
-

मुंबई महापालिकेची वैयक्तिक स्वच्छता कचरा संकलनासाठी नवी योजना; १ मेपासून अंमलबजावणी, नोंदणी प्रक्रिया सुरू
•
बृहन्मुंबई महानगरपालिकेने वैयक्तिक स्वच्छता व सॅनिटरी कचऱ्याच्या संकलनासाठी स्वतंत्र सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून, ही सेवा येत्या १ मे २०२५ पासून प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया २२ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स, टॅम्पॉन्स, कालबाह्य औषधे, दूषित कापूस, बँडेजेस, सुई, रेझर ब्लेड्स,…
-

विशेष मंत्रिमंडळ बैठकीसाठी १५० कोटींचा खर्च वाया, विरोधकांचा आरोप
•
अहिल्यानगर (चोंडी) येथे होणाऱ्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीच्या जाहिरातीत १५० कोटी रुपयांच्या खर्चाचा उल्लेख झाल्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत सरकारवर “जनतेच्या पैशाचा अपव्यय” केल्याचा आरोप केला आहे. मात्र, राज्य सरकारने स्पष्टीकरण देत हा आकडा फक्त छपाईतील चूक असल्याचे सांगितले असून, प्रत्यक्ष खर्च केवळ १.५…
-

चारधाम यात्रेतील गैर-हिंदूंना प्रवेशबंदीची साधूंची सरकारकडे मागणी
•
उत्तराखंडातील पवित्र चारधाम तीर्थक्षेत्रांमध्ये (बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री) बिगर-हिंदू व्यापारी आणि यात्रेकरूंना प्रवेश नाकारण्याची मागणी साधू-संतांच्या वर्तुळातून करण्यात येत आहे. या मागणीचे मुख्य कारण धार्मिक स्थळांची शुद्धता आणि सुरक्षा असल्याचे सांगण्यात आले आहे. शंकराचार्य परिषदेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरूप यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना पत्र लिहून, चारधाम यात्रा…
-

विवाहितेवर बलात्कार करून फरार झालेल्या नराधमाला सात वर्षांनी पश्चिम बंगालमधून अटक
•
ठाणे पोलिसांनी सात वर्षांपासून फरारी असलेल्या एका नराधमाला अखेर पकडले असून, त्याला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात यश प्राप्त केले आहे. विष पाजण्याची, बदनामी करण्याची धमकी देत आणि मारहाण करून एका सराफाच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपीला वागळे इस्टेट पोलिसांनी रंगेहाथ पकडले. आरोपीचे नाव अजब अली मज्जीद शेख (३४) आहे, आणि…
-

‘शरबत जिहाद’ विधानावर दिल्ली उच्च न्यायालयाची तीव्र टीका; रामदेव यांच्यावर जाहिरात मागे घेण्याची नामुष्की
•
योगगुरू रामदेव यांच्या ‘शरबत जिहाद’ या वादग्रस्त विधानावर दिल्ली उच्च न्यायालयाने कठोर शब्दांत टीका केली आहे. ‘रूह अफजा’ या पारंपरिक पेयावर टीका करत पतंजलीच्या शरबताचा प्रचार करताना केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने तत्काळ सर्व जाहिराती आणि व्हिडिओ हटवण्याचे आदेश दिले असून, हे विधान “अक्षम्य आणि विवेकबुद्धीला…
-

एमएसआरडीसी वाढवण बंदर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णय
•
वाढवण-इतगपुरी प्रवास केवळ एका तासात करता येणार आहे. त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाढवण बंदर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी वाढवण-इगतपुरी दरम्यान ११८ किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गाअंतर्गत ८५.३८ किमी लांबीचा चारोटी-इगतपुरी द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी एमएसआरडीसीने सोविल कन्स्लटन्सी…
-

केरळमध्ये व्यावसायिक आणि पत्नीची घरात हत्या, मुलाच्या मृत्यूची सीबीआय चौकशी आदेशानंतर घटना
•
केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील तिरुवाथुक्कल येथील एका व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीची घरात हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे, या घटनेनंतर केवळ दोन महिन्यांत, त्यांच्या मुलाच्या गौतम कृष्णकुमारच्या अनैसर्गिक मृत्यूची सीबीआय चौकशी सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मंगळवारी सकाळी ८.४५ वाजता, विजयकुमार आणि…
-

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट; देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली
•
जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. किनारपट्टी भागात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी किनारपट्टीवर अनेक ठिकाणी चेकपोस्ट उभारले आहेत. तसेच संशयित हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याचे…

