Category: News and Updates
-

फक्त १५ मिनिटांत विरार ते पालघर! ‘रो-रो’ सेवेचा जलद प्रवास सुरू
•
विरार ते खारवाडेश्री (सफाळे) या मार्गावर बहुप्रतिक्षित रो-रो फेरीबोट सेवेचा शुभारंभ आज, शनिवारी प्रायोगिक तत्त्वावर होणार आहे. ही सेवा महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत आणि मेसर्स सुवर्णदुर्ग शिपिंग अॅण्ड मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. या खाजगी संस्थेमार्फत सुरू केली जात आहे.या सेवेमुळे सध्या रस्ते मार्गाने लागणारा एक ते दीड तासांचा प्रवास केवळ १५…
-

अपघातग्रस्तांसाठी महत्त्वाचे निर्णय!रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार
•
रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार कॅशलेस उपचार मिळावेत, यासाठी रुग्णालये, आरोग्य हमी सोसायटीचे अधिकारी तसेच अंमलबजावणी संस्थांनी अधिक जबाबदारीने आणि दक्षतेने काम करावे, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. विशेषतः अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे…
-

मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणावरून भारताचा बांगलादेशला खडसावून इशारा “स्वतःच्या अल्पसंख्याकांच्या संरक्षणावर भर द्या”
•
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या जातीय हिंसाचारावर बांगलादेशकडून व्यक्त झालेल्या प्रतिक्रियेवर भारताने तीव्र नाराजी व्यक्त करत ठाम शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात बांगलादेशने अशा विधानांपासून दूर राहून स्वतःच्या देशातील अल्पसंख्याक नागरिकांच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करावे, असा स्पष्ट सल्ला दिला आहे. “मुर्शिदाबादमधील घटनेविषयी बांगलादेशकडून करण्यात…
-

मॅडम,सरांनाही यावं लागणार गणवेशात!शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा
•
मालेगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांसाठी गणवेशाची संकल्पना मांडली. डॉक्टर आणि वकिलांप्रमाणेच शिक्षकांचा सुद्धा एक खास पोशाख असावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र, ‘एक राज्य, एक गणवेश’ ही सक्ती न करता, प्रत्येक शाळेने आपल्या पातळीवर शिक्षकांसाठी एकसमान गणवेश ठरवावा, असा सल्ला त्यांनी दिला.या…
-

तनिषा भिसे मृत्यूप्रकरण : ससून समितीच्या अहवालात ठोस दोष निष्पन्न नाही – पोलिस आयुक्तांची माहिती
•
तनिषा भिसे यांच्या प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याप्रकरणी ससून जनरल रुग्णालयाच्या सहा सदस्यीय चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात कोणत्याही रुग्णालय अथवा उपचार करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध ठोसपणे ‘कारवाईयोग्य दोष’ आढळून आलेला नसल्याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. “ससून समितीचा अहवाल आज दुपारी पोलिस विभागाला प्राप्त झाला आहे,” असे…
-

ठाण्यात हिरवळीचा संहार? १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव
•
ठाणे शहरातील पायाभूत प्रकल्पांच्या झपाट्याने सुरू असलेल्या कामांमुळे आता हिरवाईवर घाला पडण्याची चिन्हं आहेत. एका विकसकाने तब्बल १,३०० झाडांची कत्तल करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव चार टप्प्यांत झाडांची तोड आणि पुनर्रोपण करण्याबाबत असून, त्यात झाडांच्या वयोमानाबाबत दाखवलेली माहिती संशयास्पद असल्याने तो वादाच्या भोवऱ्यात…
-

यमुना नदी स्वच्छतेसाठी जनआंदोलनाची हाक; पंतप्रधान मोदींचे निर्देश
•
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी गुरुवारी उच्चस्तरीय बैठकीचे नेतृत्व केले. या बैठकीत पंतप्रधानांनी संबंधित अधिकाऱ्यांना यमुना पुनरुज्जीवन मोहिमेला जनआंदोलनाचे स्वरूप देण्याचे ठाम निर्देश दिले. यासाठी उपग्रह चित्रणासह आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावरही त्यांनी भर दिला. दिल्ली सरकारच्या एका निवेदनानुसार, पंतप्रधानांनी यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी जनभागीदारीला प्रोत्साहन देण्याचा आदेश दिला.…
-

निवडणूक याचिकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उच्च न्यायालयाची नोटीस; नागपूर विजयावर काँग्रेसचा आक्षेप
•
नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून २०२४ मध्ये विजयी झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे. काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. गुडधे यांनी जानेवारी २०२४ मध्ये दाखल केलेल्या याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे की, फडणवीस…
-

गुगलची डिजिटल जाहिरात बाजारपेठेतील मक्तेदारी बेकायदेशीर – अमेरिकन न्यायालयाचा निर्णय
•
ऑनलाईन जाहिरात तंत्रज्ञानाच्या दोन प्रमुख क्षेत्रांवर गुगलने जाणूनबुजून व बेकायदेशीरपणे वर्चस्व गाजवल्याचा ठपका अमेरिकेतील एका फेडरल न्यायालयाने ठेवला आहे. या निर्णयामुळे गुगलच्या जाहिरात व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून, अमेरिकेच्या न्याय विभागाला गुगलची काही उत्पादने विभागणीसाठी कायदेशीर कारवाई सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. व्हर्जिनिया राज्यातील अलेक्झांड्रिया येथील यूएस जिल्हा…
-

‘बिग कॅट’ संवर्धनात भारताचा सहभाग; इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मुख्यालयासाठी ऐतिहासिक करार
•
मोठ्या मांजरींच्या संरक्षणासाठी भारताच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स या आंतरराष्ट्रीय संघटनेसोबत गुरुवारी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक मुख्यालय करार केला. या करारानुसार भारताला इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय आणि सचिवालय म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स ही वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, प्यूमा, जग्वार आणि चित्ता…
