केरळ मधील प्रसिध्द आणि प्रभावशाली शिवगिरी मठाने मंदिरांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी शर्ट काढण्याच्या प्रथेला थांबवण्याचा संदेश देत एक प्रभावी सामाजिक सुधारणा सुचवली आहे. येथील ९२ व्या शिवगिरी तीर्थयात्रेचे उद्घाटन करताना श्री विजयन म्हणाले की, मठाचे अध्यक्ष स्वामी सचितानंद यांनी ही उघड्या अंगाने दर्शन घेण्याची प्रथा कालबाह्य असून आधुनिक प्रगतीशील मूल्यांसोबत विसंगत असल्याचे मत व्यक्त केले.“स्वामी सचितानंद यांचे शब्द श्री नारायण गुरु यांचे सुधारक विचार, जीवन आणि संदेश यांचे प्रतिबिंब आहेत,” असे मुख्यमंत्री विजयन म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गुरुंच्या चळवळीशी संबंधित मंदिरांनी या प्रथेला आधीच नाकारले आहे आणि इतर मंदिरांनीही ही प्रथा थांबवावी अशी आशा व्यक्त केली.
‘दबाव टाकण्याची गरज नाही’
“ही प्रथा पाळण्या संदर्भात कोणावरही दबाव टाकण्याची गरज नाही. प्रगतीशील समाजात बदल अपरिहार्य आहेत. शिवगिरीने ऐतिहासिकदृष्ट्या सामाजिक सुधारणा चळवळींचे नेतृत्व केले आहे, त्याचेच हेपुढचे पाऊल आहे” असे मुख्यमंत्री म्हणाले.
Leave a Reply