‘महाराष्ट्र संशोधन केंद्रा’मध्ये भागधारकांना अचूक, निष्पक्ष व विश्वासार्ह संशोधनाचे फायदे मिळवून देणे हे आमचे लक्ष्य आहे. यासाठी आम्ही या बाबी कटाक्षाने पाळतो. माहितीवर आधारित परंतु कार्यक्षम असे संशोधन व त्याचे निष्कर्ष सहभागी व्यक्ती व गटांपर्यंत पोहोचविणे.
निष्पक्षता: आमचे संशोधन व विश्लेषण नेहमीच निष्पक्ष, पक्षपातापासून मुक्त व बाह्य प्रभावांपासून सुरक्षित असते.
प्रामाणिक कार्यप्रणाली: आम्ही वापरत असलेल्या कार्यपद्धती कुठल्याही तडजोडी नसलेल्या, पारदर्शक असतात याशिवाय त्या पुन्हा पुन्हा वापरता येतात.
जनमताचा कौल: महाराष्ट्राच्या जनतेचा दृष्टिकोन, मत, आणि कल घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही सर्वेक्षण घेत असतो. उपलब्ध माहितीचे लोकसंख्येनुसार विश्लेषण करून आम्ही मतांचे आकृतिबंध, कल आणि आकलन करीत असतो.
नैतिक आचरण: आम्ही आमच्या सर्व व्यवहारांमध्ये कायदा व नैतिकता यांचे अनुपालन करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत
नियमांचे अनुपालन: सर्व संबंधित कायदे, नियमावली आणि
इतर मानके यांचे आम्ही कसोशीने पालन करत असतो.