Tag: Maharashtra Research Center
-
भाजपमध्ये संघटनात्मक बदलाचे वारे, 22 एप्रिलपासून नव्या जिल्हाध्यक्षांची नेमणूक
•
विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय जनता पक्षाने आता लक्ष केंद्रित केले आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर. त्यासाठी पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर मोठे बदल घडवून आणण्याचा निर्धार केला असून, २२ एप्रिलपासून नव्या जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही माहिती भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली. संघटन पर्वात…
-
व्हेंटिलेटरवर असलेल्या फ्लाइट अटेंडंटवर लैंगिक अत्याचार; गुरुग्राममधील रुग्णालयातील कर्मचाऱ्याला अटक
•
गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार घेत असलेल्या, व्हेंटिलेटरवर असलेल्या ४६ वर्षीय महिला फ्लाइट अटेंडंटवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. गुरुग्राम पोलिसांनी शुक्रवारी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दीपक (वय २५) असून तो बिहारमधील मुझफ्फरपूरचा रहिवासी आहे. तो गेल्या पाच…
-
फक्त १५ मिनिटांत विरार ते पालघर! ‘रो-रो’ सेवेचा जलद प्रवास सुरू
•
विरार ते खारवाडेश्री (सफाळे) या मार्गावर बहुप्रतिक्षित रो-रो फेरीबोट सेवेचा शुभारंभ आज, शनिवारी प्रायोगिक तत्त्वावर होणार आहे. ही सेवा महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत आणि मेसर्स सुवर्णदुर्ग शिपिंग अॅण्ड मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. या खाजगी संस्थेमार्फत सुरू केली जात आहे.या सेवेमुळे सध्या रस्ते मार्गाने लागणारा एक ते दीड तासांचा प्रवास केवळ १५…
-
“मी निशब्द; संपूर्ण आयुष्यभर कृतज्ञ राहीन” वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला नाव दिल्याबद्दल रोहित शर्माची भावूक प्रतिक्रिया
•
भारतीय कसोटी व एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावाने वानखेडे स्टेडियममधील एका प्रेक्षक स्टँडला नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत १५ एप्रिल रोजी घेतला. या गौरवाबद्दल रोहितने शुक्रवारी आपली प्रतिक्रिया देताना मनापासून कृतज्ञता व्यक्त केली असून, “आता माझी भावना मला शब्दात सांगता येत…
-
अपघातग्रस्तांसाठी महत्त्वाचे निर्णय!रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार
•
रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार कॅशलेस उपचार मिळावेत, यासाठी रुग्णालये, आरोग्य हमी सोसायटीचे अधिकारी तसेच अंमलबजावणी संस्थांनी अधिक जबाबदारीने आणि दक्षतेने काम करावे, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. विशेषतः अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे…
-
मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणावरून भारताचा बांगलादेशला खडसावून इशारा “स्वतःच्या अल्पसंख्याकांच्या संरक्षणावर भर द्या”
•
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या जातीय हिंसाचारावर बांगलादेशकडून व्यक्त झालेल्या प्रतिक्रियेवर भारताने तीव्र नाराजी व्यक्त करत ठाम शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात बांगलादेशने अशा विधानांपासून दूर राहून स्वतःच्या देशातील अल्पसंख्याक नागरिकांच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करावे, असा स्पष्ट सल्ला दिला आहे. “मुर्शिदाबादमधील घटनेविषयी बांगलादेशकडून करण्यात…
-
मॅडम,सरांनाही यावं लागणार गणवेशात!शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा
•
मालेगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांसाठी गणवेशाची संकल्पना मांडली. डॉक्टर आणि वकिलांप्रमाणेच शिक्षकांचा सुद्धा एक खास पोशाख असावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र, ‘एक राज्य, एक गणवेश’ ही सक्ती न करता, प्रत्येक शाळेने आपल्या पातळीवर शिक्षकांसाठी एकसमान गणवेश ठरवावा, असा सल्ला त्यांनी दिला.या…
-
तनिषा भिसे मृत्यूप्रकरण : ससून समितीच्या अहवालात ठोस दोष निष्पन्न नाही – पोलिस आयुक्तांची माहिती
•
तनिषा भिसे यांच्या प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याप्रकरणी ससून जनरल रुग्णालयाच्या सहा सदस्यीय चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात कोणत्याही रुग्णालय अथवा उपचार करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध ठोसपणे ‘कारवाईयोग्य दोष’ आढळून आलेला नसल्याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. “ससून समितीचा अहवाल आज दुपारी पोलिस विभागाला प्राप्त झाला आहे,” असे…
-
ठाण्यात हिरवळीचा संहार? १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव
•
ठाणे शहरातील पायाभूत प्रकल्पांच्या झपाट्याने सुरू असलेल्या कामांमुळे आता हिरवाईवर घाला पडण्याची चिन्हं आहेत. एका विकसकाने तब्बल १,३०० झाडांची कत्तल करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव चार टप्प्यांत झाडांची तोड आणि पुनर्रोपण करण्याबाबत असून, त्यात झाडांच्या वयोमानाबाबत दाखवलेली माहिती संशयास्पद असल्याने तो वादाच्या भोवऱ्यात…
-
निवडणूक याचिकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उच्च न्यायालयाची नोटीस; नागपूर विजयावर काँग्रेसचा आक्षेप
•
नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून २०२४ मध्ये विजयी झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे. काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. गुडधे यांनी जानेवारी २०२४ मध्ये दाखल केलेल्या याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे की, फडणवीस…